AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: ‘मोहब्बत बड़े काम की चीज है…’, दुसऱ्या बायको समोर अरबाज खानचा भन्नाट डान्स

Video: दुसऱ्या बायकोसाठी अरबाज खानचा भन्नाट डान्स, व्हिडीओवर मलायका अरोरा हिच्या मुलाची लक्षवेधी कमेंट... व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

Video: ‘मोहब्बत बड़े काम की चीज है…’,  दुसऱ्या बायको समोर अरबाज खानचा भन्नाट डान्स
अभिनेता अरबाज खान
| Updated on: Aug 05, 2026 | 3:45 PM
Share

अभिनेता अरबाज खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. अभिनेत्री मलायका अरोरा हिला घटस्फोट दिल्यानंतर अरबाज याने 6 वर्षांनंतर मेकअप आर्टीस्ट शुरा खान हिच्यासोबत लग्न केलं. आता अरबाज याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता दुसऱ्या बायकोसाठी भन्नाट डान्स करताना दिसत आहे. शुरा हिने अरबाज याच्या वाढदिवशी त्याच्या डान्सचा व्हिडीओ पोस्ट करत, हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अरबाज खान याचा भन्नाट डान्स सर्वांनाच आवडला आहे. या व्हिडिओमध्ये अरबाज खानला रुग्णालयात दाखल केल्याचं देखील पाहायला मिळते, जिथे तो गाणे गाऊन आनंद घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या हाताला दुखापत झाली होती. आता अभिनेता पूर्णपणे बरा झाला आहे.

अरबाजच्या डान्सवर शुराची प्रतिक्रिया…

अरबाज याच्या वाढदिवशी शुरा व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, ‘माझ्यासाठी डान्स करण्यापासून, आपल्या मुलीसाठी डान्स करण्यापर्यंत… स्पष्ट आहे की, रिटायरमेंटची कोणतीच योजना आहे. शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलच्या बेडवर गाणं? शेवटी, आजारपणातून सावरतानाही मनोरंजनाची गरज असतेच… तू आयुष्य अधिक आनंदी आणि मजेशीर बनवलंस, त्यात कधीच नाराजी येऊदिली नाहीस. वाढदिवसाच्या शुभेच्छा, अरबाज… तू माझी सर्वात आवडती व्यक्ती आणि आमचा लाडका एंटरटेनर आहेस. अशीच कला सादर करत राहा… आम्ही तुझे सर्वात मोठे चाहते आहोत! आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.’

View this post on Instagram

A post shared by sshura Khan (@sshurakhan)

‘त्रिशूल’ सिनेमातील गाण्यावर अरबाजचा डान्स

या व्हिडिओमध्ये अरबाज खान 1978 मधील ‘त्रिशूल’ सिनेमातील “मोहब्बत बडे काम की चीज है” या गाण्यावर अतिशय उत्साहाने आणि मजेशीर अंदाजात डान्स करताना दिसत आहे. शुरा खानच्या या पोस्टवर अरबाज खाननेही प्रतिक्रिया दिली आहे; अभिनेता कमेंट करत म्हणाला, “माझे बेस्ट ऑडियन्स, आनंदी पत्नी, आनंदी आयुष्य…” या व्हिडिओमध्ये त्याची मुलीचीही थोडी झलक दिसली.

मलायका अरोराच्या मुलाची प्रतिक्रिया

पोस्टवर अरबाज आणि मलायका यांचा मुलगा अरहान याने देखील विनोदी कमेंट केली आहे. अरहान कमेंट करत म्हणाला, ‘सिपारा हिला मख्खी पांडे मोठं करणार आहे..’, सांगायचं झालं तर, ‘दबंग’ सिनेमात अरबाज याने मख्खी पांडे ही भूमिका साकारलेली होती.

Follow Us
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप