AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टंट ठरला जीवघेणा! शूटिंगदरम्यान स्टंटमॅनचा मृत्यू, शेवटच्या क्षणाचा भयानक व्हिडीओ व्हायरल

Stuntman Raju Dies: चित्रपटांमध्ये गाडी उडताना किंवा उंचावरून खाली पडताना पाहून प्रेक्षकांना खूप मजा येते. पण अशा एका सीनमागे अनेकांचा जीव धोक्यात असतो, विशेषतः स्टंट करणाऱ्या कलाकारांचा. साउथ इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक पा. रंजीत आणि अभिनेता आर्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात झाला आणि प्रसिद्ध स्टंटमॅन राजू (मोहनराज) याचा मृत्यू झाला.

स्टंट ठरला जीवघेणा! शूटिंगदरम्यान स्टंटमॅनचा मृत्यू, शेवटच्या क्षणाचा भयानक व्हिडीओ व्हायरल
Stunt Man RajuImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 14, 2025 | 3:21 PM
Share

चित्रपटांमध्ये गाडी उडताना किंवा उंचावरून खाली पडताना असे अनेक सीन असतात, ज्यांना पाहून प्रेक्षक टाळ्या वाजवतात. पण अशा एका सीनमागे अनेकांचा जीव धोक्यात असतो, विशेषतः स्टंट करणाऱ्या कलाकारांचा. साउथ इंडस्ट्रीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. दिग्दर्शक पा. रंजीत आणि अभिनेता आर्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात झाला. कार स्टंट करताना प्रसिद्ध स्टंटमॅन राजू (मोहनराज) याचा मृत्यू झाला. त्याचा शेवटचा आणि भयानक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सेटवर काय घडलं?

साउथ अभिनेता विशालने स्टंटमॅन राजू याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याच्या मृत्यूबद्दल दुख: व्यक्त केलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, गाडी रॅम्पवरून गेली आणि पलटून जोरात खाली पडली. गाडीचा पुढचा भाग जमिनीवर जोरात आदळला. सुरुवातीला सेटवरील सर्वजण शूटिंग करत होते, पण काही वेळाने सर्वजण गाडीकडे धावले आणि राजूला गाडीतून बाहेर काढण्यात आलं.

वाचा: स्मशानभूमीजवळ कारमध्ये बड्या नेत्याशी इश्कबाजी, महिलेसोबत नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडलं.. नंतर जे घडलं

शूटिंगदरम्यान स्टंटमॅनचा मृत्यू

दिग्दर्शक पा. रंजीत सध्या त्यांच्या नव्या चित्रपट ‘वेट्टूवम’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. नागपट्टिनम येथे चित्रपटाच्या सेटवर हा मोठा अपघात घडला, ज्यामध्ये स्टंटमॅनचा मृत्यू झाला. सुरुवातीला असं सांगितलं गेलं होतं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, पण व्हिडीओ समोर आल्यानंतर स्पष्ट झालं की हा अपघात स्टंटमुळे झाला. स्टंटमॅन राजू शूटिंगदरम्यान एक SUV गाडी चालवत होते. गाडी रॅम्पवरून गेली आणि जोरात खाली पडली.

गाडीचा पुढचा भाग जमिनीवर जोरात आदळला. सुरुवातीला सर्वजण शूटिंग करत होते, पण काही वेळाने सर्वजण त्यांच्या दिशेने धावले आणि त्यांना गाडीतून बाहेर काढलं. हा व्हायरल व्हिडीओ 13 जुलैचा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या अपघातात राजू यांचा मृत्यू झाला.

विशालने काय ट्वीट केलं?

या अपघाताने साउथ इंडस्ट्री हादरली आहे. अभिनेता विशालने ट्वीट करत लिहिलं, “ही बाब पचवणं खूप कठीण आहे की कार पलटण्याचा सीन करताना स्टंटमॅन राजू यांचा मृत्यू झाला. मी राजू यांना अनेक वर्षांपासून ओळखतो, त्यांनी माझ्या चित्रपटांमध्ये अनेक धोकादायक स्टंट केले होते. ते खूप धाडसी व्यक्ती होते.” त्याने राजू यांच्या कुटुंबाला मदत करण्याचं आश्वासनही दिलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.