AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिनेमाची तिकीटे विकली, पोस्टर लावली; पाहा कोणी उभी केली 17,300 कोटींची PVR कंपनी

success story : एखादी कंपनी उभी करणे किती अवघड असते हे प्रत्येकाला माहित आहे. कोणतंही साम्राज्य उभे करण्यासाठी चिकाटी आणि मेहनत फार महत्त्वाची असते. सातत्य ठेवून एखादा व्यक्ती करोडो रुपयांची कंपनी उभी करतो हे कथा अनेकांना प्रेरणा देणार आहे. कोण आहेत पीव्हीआरचे मालक जाणून घ्या.

सिनेमाची तिकीटे विकली, पोस्टर लावली; पाहा कोणी उभी केली 17,300 कोटींची PVR कंपनी
| Updated on: Oct 16, 2023 | 3:10 PM
Share

PVR Success Story : देशातील मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सिनेमाप्रेमीला PVR माहित आहे. अनेकांनी या मल्टिप्लेक्समध्ये जावून चित्रपटही पाहिले असतील. पण पीव्हीआरची सक्सेस स्टोरी खूप कमी लोकांना माहित आहे. पीव्हीआर हे मल्टिप्लेक्स अस्तित्वात कसे आले याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पीव्हीआर ज्यांनी सुरू केले त्या व्यक्तीचे नाव अजल बिजली असे आहे. त्यांची ही स्टोरी अनेकांसाठी प्रेरणा देणारी आहे. आपल्या वडिलोपार्जित व्यवसायासोबतच त्यांनी काहीतरी करण्याचा विचार केला जो भारतातील मल्टिप्लेक्सच्या उदयाची कहाणी बनला.

PVR चे फुलफॉर्म काय?

PVR चे फुलफॉर्म खूप कमा लोकांना माहित असेल. त्याचे फुलफॉर्म आहे ‘प्रिया व्हिलेज रोड शो’. 1997 मध्ये अजय बिजली यांनी तो सुरू केला होता. पण पीव्हीआरच्या निर्मितीची कहाणी इथून सुरू होत नाही. यासाठी आणखी मागे जावे लागेल. पीव्हीआरचे संस्थापक अजय बिजली यांनी 1988 मध्ये वडिलांसोबत वडिलोपार्जित वाहतूक व्यवसायात प्रवेश केला. पण त्यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती, त्यामुळे अजय बिजलीने वडिलांचे न ऐकता सिनेमाच्या व्यवसायात उतरले.

अजय यांनी 1978 मध्ये दिल्लीत त्याच्या वडिलांनी विकत घेतलेल्या प्रिया सिनेमाची (तेव्हा प्रिया लव विकास सिनेमा म्हणून ओळखली जाणारी) सुधारणा करण्यासाठी निघाले. अजय यांना भारतातील सिनेमागृहांना नवा आकार आणि आयाम द्यायचा होता. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. अजय बिजली सांगतात की, त्यांनी स्वतः चित्रपटाचे पोस्टर लावले आणि पीव्हीआर या ब्रँडअंतर्गत तिकिटेही विकली.

वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या वाहतूक व्यवसायाची जबाबदारी अजय यांच्यावर आली. त्यांनी या व्यवसायाची जबाबदारी अमृतसरस्थित आपल्या चुलत भावांकडे सोपवली आणि काही भागभांडवल स्वत:कडे ठेवले.

प्रिया सिनेमा पीव्हीआर ब्रँड कसा बनला

अजय बिजली यांनी पुन्हा पीव्हीआर हा मल्टिप्लेक्स ब्रँड बनवण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी ‘प्रिया’ ऑस्ट्रेलियन कंपनी व्हिलेज रोडशोसोबत एकत्र करून पीव्हीआर तयार केला. 1997 मध्ये, अजय बिजली यांनी दिल्लीत पहिले PVR मल्टिप्लेक्स उघडले. यानंतर देशात मल्टिप्लेक्सची क्रांती झाली. आज PVR हा देशातील आघाडीचा मल्टीप्लेक्स सिनेमा ब्रँड मानला जातो.

कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, PVR च्या देशभरातील 115 शहरांमध्ये एकूण 1708 स्क्रीन आहेत. यापैकी काही श्रीलंकेतही आहेत. PVR स्क्रीनची एकूण प्रेक्षक क्षमता 3.59 लाख आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध PVR चे एकूण बाजार भांडवल सुमारे 17,300 कोटी रुपये आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.