Suchismita Routray | अमिताभ-रणबीर-सुशांतसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर केले काम, आता ‘मोमो’ विकून हाकतेय जीवनाचा गाडा!

सुचिस्मिताने बर्‍याच दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे .मग ते अमिताभ बच्चन असोत किंवा रणबीर कपूर, सुशांत सिंह राजपूत किंवा अभिषेक बच्चन... पण आयुष्याने असे वळण घेतले की, तिला मुंबईहून कटक येथे घरी परत जावे लागले.

Suchismita Routray | अमिताभ-रणबीर-सुशांतसारख्या मोठ्या कलाकारांबरोबर केले काम, आता ‘मोमो’ विकून हाकतेय जीवनाचा गाडा!
सुचिस्मिता
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 3:37 PM

मुंबई : लॉकडाऊन आणि कोरोना संसर्गाने आपल्या सर्वांच्या जीवनावर किती प्रमाणात परिणाम केला आहे, याचे मोजमाप करणे देखील अवघड झाले आहे. कोट्यवधी लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अडचणीच्या वेळी आपल्या प्रियजनांपासून दूर राहून लाखो लोक मनानेही कणखर बनले आहेत. पैशांच्या तंगीने कर्ज वाढले आणि जेव्हा उद्योग थांबला अनेकांचे संपूर्ण जग उध्वस्त झाले. लॉकडाऊन दरम्यान चित्रपटसृष्टीतही काम ठप्प झाले. सेलिब्रिटीज त्यांच्या बचतीमुळे जगू शकले, पण कॅमेरामन, तांत्रिक कामगार, कनिष्ठ कलाकार या सर्वांचे आयुष्य मात्र यात भरडले गेले. सुचिस्मिता राउत्रेच्या (Suchismita Routray) बाबतीतही असेच घडले आहे (Suchismita Routray a female cameraman worked with Amitabh bachchan selling momo on road).

गेली सहा वर्षे सहाय्यक कॅमेरामॅन म्हणून काम करत असलेल्या सुचिस्मिताला आज मोमोज विकून आपले जीवन जगावे लागत आहे.

मुंबईहून घरी परतण्यासाठीही नव्हते पैसे!

सुचिस्मिताने बर्‍याच दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे .मग ते अमिताभ बच्चन असोत किंवा रणबीर कपूर, सुशांत सिंह राजपूत किंवा अभिषेक बच्चन… पण आयुष्याने असे वळण घेतले की, तिला मुंबईहून कटक येथे घरी परत जावे लागले. सुचिस्मिताकडे घरी जाण्यासाठी देखील पैसे नव्हते. त्यानंतर सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या काही कलाकारांनी तंत्रज्ञांना मदत केली, तेव्हा सुचिस्मितालाही काही पैसे मिळाले. त्यातून ती आईकडे घरी परत गेली. आता ती रोज संध्याकाळी कटकच्या रस्त्यावर मोमोज विकते आणि घर चालवते.

दररोज मिळतात 300-400 रुपये

सुचिस्मिता उराशी मोठी स्वप्ने बाळगून ओडिशाहून मुंबईला आली होती. पण, हे दुर्दैव आहे की ही मुलगी, कॅमेराच्या मागून झगमगाटी जग पाहणारी, आता केवळ दररोज 300 ते 400 रुपये मिळवण्यासाठी जीवाचे रान करते आहे (Suchismita Routray a female cameraman worked with Amitabh bachchan selling momo on road).

कुटुंबात केवळ एकटी आई!

सुचिस्मिताच्या घरी अर्थात कुटुंबात तिच्यासोबत आईशिवाय दुसरे कोणी नाही. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर सुचिस्मिताने ओडिया साइन इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली, त्यानंतर 2015मध्ये ती स्वप्नांच्या शहरात अर्थात मुंबईत गेली. बॉलिवूडमध्ये ओळख वाढली, मग हळूहळू काम मिळणे सुरू झाले. ती एक सहाय्यक कॅमेरा मॅन बनली. तब्बल 6 वर्षे तिने या क्षेत्रात कष्ट केले, नाव कमावले. परंतु, नंतर कोरोनाने तिच्या या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे.

पितृछत्र हरपले!

सुचिस्मिताच्या वडिलांचे ती लहान असतानाच निधन झाले आहे. आई आणि सुचिस्मिताव्यतिरिक्त घरात दुसरी कोणीही व्यक्ती नाही. आईदेखील वयोपरत्वे वृद्ध झाली आहे, म्हणून ती घरीच राहते. सुचिस्मिता दिवसभर मोमोज बनवण्याची तयारी करते आणि संध्याकाळी मोमोज डब्यात भरून, ते विकण्यासाठी बाहेर पडते. यातून तिला दररोज 300 ते 400 रुपये मिळतात. या पैशातूनच सध्या ती आपला आणि आपल्या आईचा उदरनिर्वाह चालवत आहे.

(Suchismita Routray a female cameraman worked with Amitabh bachchan selling momo on road)

हेही वाचा :

पायाला गंभीर दुखापत, उभं राहण्याची शाश्वती नाही, तरीही ‘या’ अभिनेत्याने पूर्ण केला नाटकाचा शो!

Aai Kuthe Kay Karte | सणाच्या दिवशीही आईच्या वाट्याला दुःखच!  देशमुखांच्या पारंपरिक पूजेत अनिरुद्ध संजनालाही करणार सहभागी!

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.