AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sumona Chakravarti : ‘द कपिल शर्मा शो’मधील भूरीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो

'द कपिल शर्मा शो'मधील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. (Sumona Chakravarti's glamorous look)

Sumona Chakravarti : 'द कपिल शर्मा शो'मधील भूरीचा ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो
VN
VN | Updated on: Dec 28, 2020 | 11:45 AM
Share

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’मधील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. मग तो बच्चा यादव असो किंवा भूरीची भूमिका साकारणारी सुमोना चक्रवर्ती. सुमोना आणि कपिलची ऑन सेट भांडणं प्रत्येकाला आवडतात. या शोमध्ये सुमोना खूप साधी दिसते, मात्र खऱ्या आयुष्यात ती प्रचंड ग्लॅमरस आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

सुमोना सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते, ती सतत तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सध्या सर्वत्र ख्रिसमसचे वारे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे सुमोनानं देखिल ख्रिसमस सेलिब्रेशन करत या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये तिनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता, या ड्रेसमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती.

काही दिवसांपूर्वी सुमोनानं बिकिनीमध्ये काही फोटो शेअर केले होते, या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. सोबतच तिनं एका पूलमध्ये लाल बिकिनीमध्येसुद्धा फोटो शेअर केले होते. तिच्या फोटोंना लाखो लोकांनी लाईक केलं आहे. महत्वाचं म्हणजे सुमोनाचे फोटो बघून चाहते तिला चित्रपटांमध्ये ट्राय करण्याचा सल्ला देत आहेत.

वयाच्या 11 व्या वर्षी सुमोनानं अॅक्टिंगला सुरुवात केली होती. पहिल्यांदा ती अभिनेता आमीर खानच्या चित्रपटात झळकली, त्यानंतर एकता कपूरच्या ‘बडे अच्छे लगते हैं’ या मालिकेतून सुमोनाला खरी प्रसिद्धी मिळाली. मात्र ‘द कपिल शर्मा शो’मध्ये भूरीनं म्हणजेच सुमोनानं लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

संबंधित बातम्या

Kangana Ranaut | कंगनाची मुंबईवारी, पुन्हा रंगणार ‘सामना’?

Rajinikanth Health | रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार?

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...