
बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan ) गेल्या काही दिवसांपासून सतत लाईव्ह कॉन्सर्ट करताना दिसत आहे. नुकताच, सुनिधी हिचा डेहराडूनमधील एका कॉलेजमध्ये परफॉर्म पार पडला. पण कॉन्सर्ट दरम्यान असं काही घडलं ज्यामुळे चाहते संताप व्यक्त करत आहेत. कॉन्सर्ट दरम्यान सुनिधी हिच्यासोबत जे काही झालं, ज्याची सर्वत्र चर्चा रंगत आहे. कॉन्सर्ट सुरु असताना सुनिधी हिच्यावर बाटली फेकण्यात आली. घडलेल्या घडनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
शुक्रवारी सुनिधी हिचा डेहराडूनमधील एका कॉलेजमध्ये परफॉर्म होता. कॉन्सर्ट सुरु असताना सुनिधी हिच्यावर बाटली फेकण्यात आली. बाटली फेकल्यानंतर सुनिधी हिने रागात शो बंद न करता मजेशीर उत्तर देत कॉन्सर्ट पुढे सुरु ठेवला.. सुनिधी म्हणाली, ‘बाटली फेकून काय होणार आहे… शो बंद होईल? तुम्हाला शो बंद झाल्यानंतर चालेल…’ असा प्रश्न सुनिधी हिने विचारल्यानंतर रसिकांनी नाही म्हणून उत्तर दिलं.
घडलेली घटना सावरत सुनिधी हिने कॉन्सर्ट पुन्हा मोठ्या उत्साहाने सुरु ठेवला. सोशल मीडियावर सध्या सुनिधी हिचा व्हिडीओ तुफान चर्चेत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी बाटली फेकणाऱ्यांवर संताप व्यक्त केला तर, अनेकांनी सुनिधी हिला पाठिंबा दिला.
एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘तिच्या कामाचं कौतुक करायला हवं आणि लोकांनी देखील आदर करायला हवं…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ती इतकी ताकदवान आहे की ती अशा विनोद आणि क्षुल्लक गोष्टींना घाबरू शकत नाही… आयकॉनसाठी खूप आदर आहे.’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ज्याने कोणी केलं आहे त्याला तुरुंगात टाका, पुन्हा दुसऱ्यासोबत कधी करणार आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुनिधी हिची चर्चा रंगली आहे.
सुनिधी चौहान कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सुनिधी हिने अनेक प्रसिद्ध गाण्यांना स्वतःचा आवज दिला आहे. फक्त हिंदी नाही तर सुनिधी हिने मराठी, कन्नड, तमिळ, तेलुगु, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. भागे रे मन, मेहबूब मेरे आणि साकी साकी या गाण्यांमुळे सुनिधी हिला एक नवी ओळख मिळाली. सुनिधी आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांच्या यादीत अव्वल स्थानी आहे.