AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचे सर्व सिनेमे ठरले फ्लॉप, बॉलिवूडचा निरोप घेत थाटला ‘या’ क्रिकेटरसोबत संसार

Starkid Life in Bollywood: वडील लोकप्रिय अभिनेते, लेक मात्र फ्लॉप..., सर्व सिनेमे फ्लॉप होत असताना तिने घेतला बॉलिवूडचा निरोप, आता 'या' क्रिकेटरसोबत रमलीये संसारात..., अभिनेत्री कायम खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

प्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीचे सर्व सिनेमे ठरले फ्लॉप, बॉलिवूडचा निरोप घेत थाटला 'या' क्रिकेटरसोबत संसार
| Updated on: Dec 16, 2024 | 10:15 AM
Share

Starkid Life in Bollywood: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांना सिनेमांध्ये काम मिळवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत नाही. आई – वडिलांच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेमुळे स्टार किड्सना बॉलिवूडचे मार्ग मोकळे असतात. सेलिब्रिटी किड्सची बॉलिवूडमध्ये एन्ट्री सोपी असली तरी, ओळख निर्माण करण्यासाठी त्यांना कष्ट तर घ्यावेच लगतात. पण सर्वच सेलिब्रिटी किड बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळी जागा निर्माण करु शकत नाही. असं एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याच्या मुलीसोबत देखील झालं आहे.

सध्या ज्या स्टारकिडची चर्चा रंगली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेते सुनिल शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी आहे. अथिया हिने अभिनेता सलमान खानच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेल्या ‘हिरो’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

अथिया हिचा पहिला ‘हिरो’ सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर आणखी एका सिनेमात महत्त्वाची भूमिका बजावली ‘मुबारकां’ सिनेमातून अभिनेत्री चाहत्यांच्या भेटीस आली. पण तिचा दुसरा सिनेमा देखील फ्लॉप ठरला. त्यानंतर ‘नवाबजादे’ सिनेमात अथियाने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली आणि 2019 मध्ये अभिनेत्री ‘मोतीचूर चकनाचूर’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली. पण अथियाचा एकही सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट ठरला नाही. अथियाने फक्त 4 सिनेमांमध्ये भूमिका साकारली. पण एकाही सिनेमातून अभिनेत्री चाहत्यांचं मनोरंजन करु शकलेली नाही.

आता अथिया बॉलिवूडपासून दूर तिच्या संसारात रमली आहे. अथिया हिने जवळपास तीन वर्ष भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर के.एल.राहुल याला डेट केल्यानंतर 2023 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल ढाली होते.

काही दिवसांपूर्वी अथियाने चाहत्यांसोबत ‘गुडन्यूज’ देखील शेअर केली. 2025 मध्ये अथिया आणि राहुल त्यांच्या पहिल्या बाळाचं जगात स्वागत करणार आहेत. सांगायचं झालं तर, अथिया तिच्या प्रोफेशनल आयुष्यात फेल ठरली तरी, खासगी आयुष्यामुळे मात्र कायम चर्चेत असते.

अथिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा