वर्ल्ड कपच्या फायनलनंतर केएल राहुलच्या ट्रोलिंगवर अखेर सासरे सुनील शेट्टी यांनी सोडलं मौन

एखाद्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला की सोशल मीडियावर क्रिकेटर्सना खूप ट्रोल करण्यात येतं. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतरही टीका झाली होती. त्यावर आता अभिनेते सुनील शेट्टी व्यक्त झाले आहेत. केएल राहुलच्या ट्रोलिंगवर अखेर त्यांनी मौन सोडलं आहे.

वर्ल्ड कपच्या फायनलनंतर केएल राहुलच्या ट्रोलिंगवर अखेर सासरे सुनील शेट्टी यांनी सोडलं मौन
KL Rahul and Suniel ShettyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 3:48 PM

मुंबई : 13 डिसेंबर 2023 | अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीने टीम इंडियाचा क्रिकेटर के. एल. राहुलशी यावर्षी जानेवारी महिन्यात लग्न केलं. ही जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा के. एल. राहुल आणि अथिया यांना नेटकऱ्यांनी विविध कारणांमुळे ट्रोल केलं गेलंय. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर क्रिकेटर्सना ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र प्रत्येक क्षेत्रात चढउतार येतच असतात, त्यामुळे कधीच निराश होऊ नये, असा समज सुनील शेट्टी मुलगी अथियाला देतात. मुलीला समजावत असतानाच जेव्हा जावयाला ट्रोल केलं जातं, तेव्हा कसं वाटतं, याविषयीही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील शेट्टी हे विविध मुलाखतींमध्ये जावई के. एल. राहुलबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. ते नेहमीच त्याला प्रोत्साहन देतात. त्यांनी के. एल. राहुलला कधीच या गोष्टीची जाणीव करू दिली नाही की मैदानात एखादी गोष्ट चुकली किंवा परफॉर्मन्स चांगला देता आला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले की के. एल. राहुलला ट्रोल केल्यावर त्यांना सर्वाधिक त्रास होतो. त्याला ट्रोल केलेलं अजिबात आवडत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

सुनील शेट्टी म्हणाले, “ट्रोलिंगला जेवढा त्रास राहुलला होत असेल, त्याच्यापेक्षा 100 पटींनी जास्त त्रास मला होतो. तरीसुद्धा तो मला नेहमी म्हणतो की तुम्ही त्याबद्दल प्रतिक्रिया देऊ नका. त्या ट्रोलिंगला मी माझ्या खेळीनेच उत्तर देईन. लोकांना, सिलेक्टर्सना आणि कॅप्टनला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण तरी अथिया किंवा राहुलला कोणी ट्रोल करत असेल तर ते पाहून मला खूप त्रास होतो.”

“टीम इंडिया जेव्हा मैदानावर खेळत असते, तेव्हा मी घरी तो सामना पाहतानाही बऱ्याच गोष्टींचं पालन करत असतो. याबाबतीत मी खूप अंधविश्वासू आहे. मी संपूर्ण वर्ल्ड कप माझी पत्नी माना शेट्टीसोबत जमिनीवर बसून पाहिला आहे. राहुल जेव्हा बॅटिंग करतो, तेव्हा मला खूप हूरहूर लागलेली असते. कारण माझा मुलगाच तिथे खेळत असतो. मी नेहमीच त्याच्या चांगल्यासाठी विचार करेन. त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर मला प्रत्येक क्रिकेटरविषयी कौतुक आणि सहानुभूती वाटते. जेव्हा तुमचा मुलगा आयुष्यात कठीण काळाचा सामना करत असेल, तेव्हा तुम्हालासुद्धा त्याचा त्रास होतो. तो जरी त्या खेळात कुशल असला तरी तुम्ही त्याच्याकडे एक पिता म्हणूनच पाहता”, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Non Stop LIVE Update
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ.
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?.
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.