AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Lahri : येणारा काळ संकटांनी भरलेला…’रामायण’ फेम सुनील लहरींचं वक्तव्य, कारण काय?

Sunil Lahri : 'रामायण' फेम अभिनेते सुनील लहरी यांनी देशवासियांना आवाहन करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये, ते लोकांना येणाऱ्या आपत्तीबद्दल सावध करत आहेत.

Sunil Lahri : येणारा काळ संकटांनी भरलेला...'रामायण' फेम सुनील लहरींचं वक्तव्य, कारण काय?
| Updated on: Oct 06, 2026 | 7:29 PM
Share

रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेते सुनील लहरी यांना भविष्याची काळजी आहे. सुनील यांनी सोमवारी रात्री १० वाजता एक व्हिडिओ शेअर करून आपल्या देशवासियांना सावध केलं आहे. ‘येणारा काळ संकटांनी भरलेला असू शकतो,आपण एकत्र येऊन त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे.’ असं सुनील यांनी म्हटलं आहे.

१९८७ च्या ‘रामायण’ या टीव्ही मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेल्या सुनील लाहरी यांनी २ मिनिटे २० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये ‘अल निनो’ या घटनेवर आणि पर्जन्यमान, शेती व जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांवर चर्चा केली आहे.

सुनील लहरी यांचा व्हिडिओ

सुनील लहरी म्हणाले, ‘नमस्कार मित्रांनो, आजकाल ‘अल निनो’ या शब्दाची खूप चर्चा होत आहे. याचा संबंध निसर्ग, हवामान आणि वातावरणातील बदलांशी आहे. तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही गुगलवर शोधू शकता. हा अल निनो जगभरात, विशेषतः आशियाई देशांमध्ये आणि आपल्या देशातही मोठ्या आपत्त्या आणेल. हवामान बदलल्यामुळे खूप उष्णता वाढेल, ज्यामुळे पाण्याची मोठी टंचाई निर्माण होईल. पिकांचं नुकसान होईल आणि खतांचाही तुटवडा निर्माण होईल, कारण आपण खतं आणि इंधनासाठी परदेशी देशांवर अवलंबून आहोत. आपल्याकडे पैसे असले तरी आपण त्याचं काहीही करू शकत नाही. जर वस्तू अस्तित्वात नसतील, तर आपण त्यांचं काय करणार?’

‘म्हणून आता प्रत्येक गोष्टीची थोडी बचत करण्याची वेळ आली आहे. आपण खूप हुशार आहोत. भारतीयांना बचत करण्याची सवय आहे. आपल्याला संकटांशी लढण्याचीही सवय आहे. आपण न थांबता कोविड-१९ मधून वाचलो. त्याचप्रमाणे, मला खात्री आहे की आपण या संकटातूनही बाहेर पडू.’ सुनील म्हणतात की, त्यांचा व्हिडिओ लोकांना घाबरवण्यासाठी नाही. आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, सुनील यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांना रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाच्या भूमिकेनं प्रसिद्धी मिळाली. यानंतर, ते ‘परम वीर चक्र’ (१९८८), ‘लव कुश’ (१९८८) आणि ‘सपनों की दुनिया’ (१९९५-१९९६) यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसले. मोठ्या पडद्यावर त्यांनी ‘बहारों की मंझिल’ (१९९१), ‘आजा मेरी जान’ (१९९३), ‘जनम कुंडली’ (१९९५) आणि ‘अ डॉटर्स टेल: पंख’ (२०१७) या चित्रपटांमध्ये काम केलंय.

Follow Us
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?
आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; कौलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद
Shivsena : आधी फूट, नंतर अपात्रता असा क्रम...; शिंदे गटाचे वकील नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी 19 तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
रत्नागिरीत भातशेती वाचवण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा दुष्काळाशी संघर्ष
1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
Video : 1 लाख 65 हजार 800 चालक शिकले मराठी, अन्... काय म्हणाले प्रताप सरनाईक?
काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल
दिल्लीतील आंदोलन, काँग्रेस खासदार रेणुका चौधरींचा महिला सुरक्षेबाबत सरकारला थेट असा सवाल!