AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunita Ahuja : नेहमी गोविंदाला घालून पाडून बोलणारी सुनीता लॉकअप 2 मधून बाहेर आल्यावर जे बोलली ते ऐकून कानांवर विश्वास नाही बसणार

Sunita Ahuja : मी वयाच्या 15 व्या वर्षी गोविंदाच्या प्रेमात पडले. गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावरुन तिने आतापर्यंत गोविंदाला बरच काही सुनावलं आहे. त्याच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे 90 च्या दशकातील पडद्यावरच्या या चॉकलेट हिरोचं खासगी आयुष्य नेहमी चर्चेत असतं.

Sunita Ahuja : नेहमी गोविंदाला घालून पाडून बोलणारी सुनीता लॉकअप 2 मधून बाहेर आल्यावर जे बोलली ते ऐकून कानांवर विश्वास नाही बसणार
Sunita Ahuja-GovindaImage Credit source: instagram
| Updated on: Jul 12, 2026 | 4:25 PM
Share

गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा रियलिटी शो ‘लॉकअप 2’ मधून बाहेर आली आहे. शनिवारी 11 जुलैला जजमेंट डे च्या एपिसोडवेळी गोविंदा आणि त्याची मुलगी टीना आहूजा तिला आणण्यासाठी तिथे गेले होते. शो मध्ये असताना सुनीता अनेकदा लग्नामध्ये होणाऱ्या फसवणुकीबद्दल बोलताना दिसली. गोविंदाची अनेक प्रेम प्रकरणं होती असा तिने दावा केला. बाहेर आल्यानंतर सुनीता आहूजा शो मधील तिचा अनुभव, लग्नावरचा विश्वास आणि प्रेमाबद्दल बोलली. त्या सोबतच सुनीता विवाहबाह्य संबंधांबद्दल सुद्धा मोकळेपणाने बोलली. इंडस्ट्रीमध्ये हे खूप कॉमन असल्याचं तिने म्हटलं. ‘गोविंदाला मी कधीही सोडणार नाही’ हे सुद्धा सुनीताने सांगितलं.

सुनीता आहूजा गोविंदाला अनेकदा घालून पाडून बोलताना दिसते. त्याच्यावर वेगवेगळे आरोप करत असते. पण ‘लॉकअप’ सीजन 2 मधून बाहेर आल्यानंतर तिने गोविंदावरच आपलं प्रेम व्यक्त केलं. कितीही आव्हानं आली, तरी गोविंदाला सोडणार नाही असं तिने म्हटलं. विश्वास आणि माफ करण्याची सवय यामुळे अजूनही एकत्र आहोत असं 40 वर्षाच्या नात्याबद्दल बोलताना सुनीता म्हणाली. कुठल्याही फिल्म स्टार सोबत लग्न करण्यासाठी दगडासारखं ह्दय हवं. खऱ्या प्रेमाचा अर्थ माफ करणं आणि पुढे जाण आहे असं सुनीता म्हणाली.

एक मोठी अचीवमेंट आहे

गोविंदासोबत इतकी वर्ष साथ टिकून आहे, त्या बद्दलही सुनीता बोलल्या. “बघा, आजही आम्ही एकत्र आहोत. आम्ही ऐकमेकाशिवाय जगू शकत नाही. मी शिल्पा शिंदेला बोलले. ते माझे पती आहेत. मी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची साथ कधी सोडणार नाही. भले, ते काहीही करो. आम्ही 40 वर्ष एकत्र घालवली आहेत. हा काही जोक नाही. इतकी वर्ष फिल्म इंडस्ट्रीत टिकून राहणं एक मोठी अचीवमेंट आहे. आजही आम्ही एकत्र आहोत. परस्परांवर प्रेम करतो” असं सुनीता अहूजा म्हणाल्या.

अभिनेत्याची बायको बनण्यासाठी दगडाचं ह्दय हवं

चीटिंग, विश्वास आणि माफी बद्दल बोलताना सुनीता आहूजा म्हणाली की, “विश्वास मोठी गोष्ट आहे. मला नाही वाटतं की, फिल्म इंडस्ट्रीत कुठला हिरो धुतल्या तांदळासारखा आहे. आमच्यापेक्षा ते लोक जास्तवेळ हिरॉइन सोबत घालवतात. बऱ्याच गोष्टी तुमच्या प्रेमावर सुद्धा अवलंबून आहेत. तुम्ही या गोष्टी कशा स्वीकारता, परिस्थितीचा कसा सामना करता. मी नेहमी म्हटलय की अभिनेत्याची बायको बनण्यासाठी दगडाचं ह्दय हवं. प्रेम खरं असतं, तेव्हा तुम्ही माफ करता आणि पुढे जाता”

Follow Us
नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात
Nita Ambani | नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात बहुमान!
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा मार्ग
मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
Moshi Building Collapsed | मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
'मातोश्री'बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलता
'मातोश्री' बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलताना नेत्याचा मोठा खुलासा!
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना...
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना... FDA ची धडक कारवाई
2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
Girija Raut | 2 कोटींचा दबाव टाकला आणि...गिरीजा राऊतांचा मोठा गौप्यस्फोट!
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांचं उत्तर
अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांची प्रतिक्रिया तुफान चर्चेत
अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
मोठी बातमी! अभिनेता रोहित चंदेलवर कारवाई, अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर थेट...
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं
कोणी जिवंत कोंबडा अंगावरून उतरवला तर कोणी...विनायक राऊतांच्या सूनेनं सांगितली लग्नानंतरची प्रत्येक घटना