AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोविंदा इम्प्रेस करण्यासाठी 15 व्या वर्षी सुनीताने केलेली ही गोष्ट, त्यानंतर गुपचूप केलेलं लग्न

गोविंदाला इम्प्रेस करण्यासाठी पत्नी सुनीता आहुजाने वयाच्या 15 व्या वर्षी केलं होतं हे काम. अनेक वर्षानंतर केला खुलासा.

गोविंदा इम्प्रेस करण्यासाठी 15 व्या वर्षी सुनीताने केलेली ही गोष्ट, त्यानंतर गुपचूप केलेलं लग्न
Image Credit source: Social media
| Updated on: May 28, 2026 | 2:04 PM
Share

बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि मजेशीर किस्स्यांमुळे चर्चेत असते. ती अनेकदा आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल खुल्या दिलाने बोलताना दिसते. नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान तिने गोविंदाला इम्प्रेस करण्यासाठी अवघ्या 15व्या वर्षी स्वयंपाक शिकल्याचा रंजक खुलासा केला.

सुनीता आहुजाने तिची मुलगी टिना आहुजा हिच्यासोबत ‘माँ है ना’ या शोमध्ये आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. शोदरम्यान तिने स्वयंपाकाची आवड आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तिने हसत म्हटले, स्वयंपाक करूनच नवऱ्याला पटवलं आहे. यावेळी तिने सांगितले की, गोविंदाला खाण्याची खूप आवड असल्यामुळे तिने लहान वयातच स्वयंपाक शिकण्यास सुरुवात केली होती. माझं लग्न खूप लवकर झालं होतं आणि माझ्या नवऱ्याला खाण्याची खूप आवड होती असे ती म्हणाली. पुढे तिने सांगितले की, गोविंदाला प्रभावित करण्यासाठी तिने केवळ 15व्या वर्षीच स्वयंपाक शिकून घेतला होता.

किशोरवयातच फुललं प्रेम

गोविंदा आणि सुनीता आहुजा यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ एकत्र असलेल्या जोडप्यांपैकी एक मानली जाते. वृत्तांनुसार, दोघांची पहिली भेट कौटुंबिक ओळखीतून झाली होती. त्यानंतर हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलले. त्या काळात गोविंदा सुमारे 21 वर्षांचे होते तर सुनीता फक्त 15 वर्षांच्या होत्या. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर मार्च 1987 मध्ये गुपचूप लग्न केले. विशेष म्हणजे, त्या काळात गोविंदा बॉलिवूडमध्ये मोठे स्टार बनण्याच्या मार्गावर होता.

या दाम्पत्याला दोन मुले आहेत. मुलगी टीना ही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे तर मुलगा यशवर्धन आहुजा हा देखील चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांत गोविंदा आणि सुनीता यांनी आपल्या नात्यातील चढ-उतार, कौटुंबिक जीवन आणि मतभेदांबद्दलही खुलेपणाने भाष्य केले आहे. त्यामुळेच ही जोडी चाहत्यांमध्ये अधिक लोकप्रिय झाली आहे. सुनीता आहुजाच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्या प्रेमळ नात्याचे कौतुक केले आहे. गोविंदासाठी एवढ्या लहान वयात स्वयंपाक शिकण्याचा त्यांचा किस्सा चाहत्यांना विशेष आवडला आहे.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...