AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देओल भावंडांचं ‘जमाल कुडू’ गाण्यावर भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटातील 'जमाल कुडू' हे गाणं आजही सोशल मीडियावर हिट आहे. याच गाण्यावर बॉबी देओलसह भाऊ सनीनेही ठेका धरला आहे. एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

देओल भावंडांचं 'जमाल कुडू' गाण्यावर भन्नाट डान्स, पहा व्हिडीओ
Sunny and Bobby DeolImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 12, 2024 | 3:48 PM
Share

मुंबई : 12 मार्च 2024 | देओल भावंडं अर्थात सनी देओल आणि बॉबी देओल हे दोघं सध्या यशाचा आनंद घेत आहेत. ‘गदर 2’ या चित्रपटातून एकीकडे सनी देओलने दमदार कमबॅक केलं. तर दुसरीकडे ‘ॲनिमल’ या चित्रपटातील भूमिकेमुळे बॉबी देओल तुफान चर्चेत आला. याच चित्रपटात बॉबीने ‘जमाल कुडू’ या गाण्यावर ठेका धरला होता. हे गाणं सोशल मीडियावर हिट ठरलं होतं. आता याच गाण्यावर देओल भावंडांनी भन्नाट डान्स केला आहे. दारुचा ग्लास डोक्यावर ठेवून नाचण्याची हुक स्टेप चर्चेत आली होती. तीच स्टेप सनी आणि बॉबीने करून दाखवली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका पुरस्कार सोहळ्यात दोघांनी हा डान्स केलाय.

पापाराझी अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये बॉबी देओल त्याच्या ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स करताना दिसतोय. गाणं सुरू होताच बॉबी क्षणभरासाठी थांबतो आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सनी देओलकडे बघतो. त्यानंतर सनीसुद्धा स्टेजवर येऊन बॉबीसोबत हुक स्टेप करू लागतो.

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटात बापलेकाच्या नात्यातील संघर्ष एका हिंसक विश्वाच्या पार्श्वभूमीवर दाखवण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूरने रणविजय सिंहची भूमिका साकारली आहे. तर अभिनेते अनिल कपूर हे त्याच्या वडिलांच्या म्हणजेच बलबिर सिंहच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील मुख्य कलाकारांसोबतच खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या बॉबी देओलचं विशेष कौतुक झालं.

पहा व्हिडीओ

भावाच्या चित्रपटाला मिळालेल्या यशावर प्रतिक्रिया देताना सनी देओल म्हणाला होता, “मी खरंच बॉबीसाठी खूप खुश आहे. मी त्याचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट पाहिला आणि तो मला आवडला. हा एक चांगला चित्रपट आहे. पण त्यातील काही गोष्टी मला आवडल्या नाहीत, ज्या मला माझ्या चित्रपटांसहित इतरही अनेक चित्रपटांमध्ये आवडल्या नाहीत. एक व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून मला त्या गोष्टी आवडण्याचा किंवा न आवडण्याचा अधिकार आहे. पण एकंदर पाहता ‘ॲनिमल’ हा चांगला चित्रपट आहे.”

‘ॲनिमल’मधील एका सीनमध्ये रणविजय (रणबीर) हा अबरारचा (बॉबी) भाऊ असरार हकची हत्या करतो. याबद्दलची माहिती जेव्हा अबरारला देण्यात येते, तेव्हाचा हा सीन आहे. चित्रपटात अभिनेता बबलू पृथ्वीराजने बॉबी देओलच्या भावाची भूमिका साकारली आहे. या सीनविषयी बोलताना बॉबी म्हणाला, “मी जेव्हा चित्रपटातील सीन शूट करत होतो, तेव्हा तो सीन हा भाऊ गमावल्याचा होता. एका भावाने त्याच्या दुसऱ्या भावाला गमावलंय. असा सीन शूट करताना एक अभिनेता म्हणून आम्हाला आमच्या खऱ्या आयुष्यातील घटना आठवून मनात त्या भावना आणायच्या असतात. त्याच भावना आम्हाला पडद्यासमोर मांडायच्या असतात. माझ्यासाठी माझा भाऊ म्हणजे संपूर्ण विश्व आहे. जेव्हा मी तो सीन शूट करत होतो, तेव्हा मी माझा भाऊ गमावला आहे, अशा भावना मनात आणायच्या होत्या. त्यावेळी ती भावना इतकी तीव्र होती की खरंच असं काही झाल्याचं वाटलं होतं.”

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....