AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karan Deol | करण देओल याच्या लग्नसोहळ्यात असं झालं तरी काय? Inside व्हिडीओ पाहिल्यानंतर व्हाल हैराण

सनी देओल याच्या मुलाच्या लग्नातील Inside व्हिडीओ समोर; सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यात असं झालं तरी? व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

Karan Deol | करण देओल याच्या लग्नसोहळ्यात असं झालं तरी काय? Inside व्हिडीओ पाहिल्यानंतर व्हाल हैराण
| Updated on: Jun 19, 2023 | 12:35 PM
Share

मुंबई | दिग्गज अभिनेता आणि खासदार सनी देओल यांच्या मुलाचं नुकताच मोठ्या थाटात लग्न झालं. देओल कुटुंबाचा मुलगा करण देओल याने गर्लफ्रेंड द्रिशा आचार्य हिच्यासोबत १८ जून रोजी लग्न केलं.. सध्या करण आणि द्रिशा यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. करण आणि द्रिशा यांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर अनेकांनी नव्या जोडप्याला नव्या आयुष्याला शुभेच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या. आता करण देओल याच्या लग्नसोहळ्यातील काही इनसाईड व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र करण आणि द्रिशा यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे..

देओल कुटुंबाने लग्नानंतर रिसेप्शनपार्टीचं आयोजन केलं होतं. रिसेप्शन पार्टीमध्ये सलमान खान, प्रेम चोप्रा, आमिर खान यांसारखे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचा रंग रंगला.. रिसेप्शन पार्टीमध्ये अनेक अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे पार्टीमध्ये एक वेगळं आणि आनंदाचं वातावरण तयार झालं.

रिसेप्शन पार्टीमध्ये सनी देओल यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. शिवाय गायक सोनू निगम याने रिसेप्शन पार्टीमध्ये हजेरी लावल्यानंतर सर्वत्र संगीतमय वातावरण निर्माण झालं होतं. रिसेप्शन पार्टीमध्ये सनी देओल आणि सोनू निगम यांनी ‘ये दोस्ती हम नाही तोडेंगे…’ गाणं गायलं… दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by BollywoodNow (@bollywoodnow)

सनी देओल आणि सोनू निगम यांनी ‘ये दोस्ती हम नाही तोडेंगे…’ गाणं गायल्यानंतर जमलेले अन्य पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. दोघांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर युजर्स कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत… सध्या सर्वत्र करण आणि द्रिशा यांच्या लग्नाची आणि रिसेप्शन पार्टीची चर्चा सुरु आहे..

View this post on Instagram

A post shared by BollywoodNow (@bollywoodnow)

करण देओल आणि द्रिशा आचार्य यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनी देखील हजेरी लावली. दोघांनी डान्स देखील केला.. नव्या जोडप्यासह दीपिका आणि रणवीर यांचा डान्स तुफान व्हायरल होत आहे… सोनू निगम याच्या गाण्यावर पाहुण्यांनी आनंद लुटला..

सोशल मीडियावर सध्या सर्वत्र करण आणि द्रिशा यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.. लग्नसोहळ्यात अभिनेत्री धर्मेंद्र यांची एक झलक देखील चाहत्यांना पाहायला मिळाली. नातवाच्या लग्नात धर्मेंद्र प्रचंड आनंदी होते..

Follow Us
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी