AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Deol | अमृता सिंगसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर पत्नीची काय प्रतिक्रिया? सनी देओल म्हणाला..

अभिनेता सनी देओलचं इंडस्ट्रीत बऱ्याच अभिनेत्रींशी नाव जोडलं गेलं होतं. त्यापैकीच एक नाव म्हणजे अमृता सिंग. या अफेअरच्या चर्चांवर पत्नी पूजाची काय प्रतिक्रिया असते, असा प्रश्न विचारला असता सनी देओलने मोकळेपणे उत्तर दिलं.

Sunny Deol | अमृता सिंगसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर पत्नीची काय प्रतिक्रिया? सनी देओल म्हणाला..
Sunny Deol with wife Pooja and actress Amrita SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 05, 2023 | 11:46 AM
Share

मुंबई | 5 सप्टेंबर 2023 : अभिनेता सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचा 500 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. तब्बल 22 वर्षांनंतरही ‘तारा सिंग’ची क्रेझ प्रेक्षकांमध्ये अद्याप कायम असल्याचं पहायला मिळत आहे. सनी देओलने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बरेच हिट चित्रपट दिले आहेत मात्र आपल्या फिल्मी करिअरसोबतच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिला आहे. सनी देओलचं नाव बॉलिवूडमधल्या काही अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं होतं. याविषयी त्याला एका मुलाखतीत प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता. सनी देओलची ही जुनी मुलाखत नुकतीच चर्चेत आली आहे.

अफेअरच्या चर्चांवर पत्नीची प्रतिक्रिया

विविध अभिनेत्रींसोबत नावं जोडलं जातं तेव्हा काय वाटतं, असा प्रश्न सनीला ITMB मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “अशा गोष्टी होत असतात. हा खेळाचाच एक भाग आहे.” या मुलाखतीच्या वेळी सनी देओलचा पूजाशी साखरपुडा झाला होता. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार होते. पूजा आज सनी देओलची पत्नी आहे. अफेअरच्या चर्चा तिच्यापर्यंत पोहोचतात का असा प्रश्न त्याला विचारलं असता, तो पुढे म्हणाला, “तिच्यापर्यंत या सर्व चर्चा पोहोचतात की नाही हे मला माहीत नाही. पण अशा काही गोष्टीच नाहीत.”

अमृता सिंगसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया

इंडस्ट्रीत अभिनेत्री अमृता सिंगसोबत सनी देओलच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. अशा चर्चांचा राग येतो का, असंही त्याला या मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना सनी म्हणाला, “फिल्म इंडस्ट्रीत येण्याआधी लोक सेलिब्रिटींबद्दल काय लिहितात, हे सर्व मी पाहिलं आहे. हे सर्व सहन करावंच लागतं. कधी कधी उगाच वाढवून काहीही लिहिलं जातं, तेव्हा राग येतो. अशी व्यक्ती जर कधी भेटली तर त्याला मारावंसं वाटतं. अजून काय करू शकतो?”

सनी देओल आणि अमृताच्या लग्नाच्याही चर्चा इंडस्ट्रीत होत्या. मात्र अमृताच्या आईला त्यांचं नातं नामंजूर होतं. म्हणून दोघांनी लग्न केलं नाही असं म्हणतात. मात्र जेव्हा सनी देओल लग्न करणार असल्याचं अमृताला समजलं, तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. अमृताशिवाय सनी देओलचं नाव अभिनेत्री डिंपल कपाडियाशीही जोडलं गेलं होतं. काही दिवसांपूर्वीच सनी देओल, अमृता सिंग आणि डिंपल कपाडिया या तिघांना एकत्र पाहिलं गेलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?