AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | चक्क ‘या’ अभिनेत्याच्या पाया पडताना दिसला सनी देओल याचा लेक, करण याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का

सनी देओल याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसला. विशेष म्हणजे या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले. सनी देओल याचा गदर हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल आणि चित्रपटाची टिम दिसली.

Video | चक्क 'या' अभिनेत्याच्या पाया पडताना दिसला सनी देओल याचा लेक, करण याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना बसला धक्का
| Updated on: Sep 06, 2023 | 7:07 PM
Share

मुंबई : सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. सनी देओल (Sunny Deol) याने बाॅलिवूडमध्ये एक अत्यंत मोठा काळ गाजवला आहे. मात्र, बरीच वर्षे झाली सनी देओल याच्या चित्रपटाला काही धमाका करण्यात यश मिळत नव्हते. काही दिवसांपूर्वीच सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट (Movie) रिलीज झालाय. विशेष म्हणजे गदर 2 ने मोठा धमाका केलाय. गदर 2 चित्रपटाची एक मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळाली. 22 वर्षांनंतरही तोच उत्साह चाहत्यांमध्ये बघायला मिळाला. गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला.

गदर 2 चित्रपट नुकताच 500 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झालाय. पुढील काही दिवसांमध्ये गदर 2 च्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते, असे सांगितले जातंय. मात्र, चित्रपटाने तूफान अशी कमाई केलीये. विशेष म्हणजे गदर 2 हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. अजूनही चाहते चित्रपटाला प्रेम देत आहेत.

मुंबईमध्ये सनी देओल याच्याकडून गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे या सक्सेस पार्टीला अनेक बाॅलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. गदर 2 च्या सक्सेस पार्टीमध्ये शाहरुख खान हा देखील पोहचला.

शाहरुख खान आणि सनी देओल याचा मुलगा करण यांचा एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. शाहरुख खान याला पाहून लगेचच त्याच्या पाया पडताना सनी देओल याचा मुलगा करण दिसत आहे. यावेळी सनी देओल हा देखील तिथेच शेजारी दिसतोय. यावेळी करण याची पत्नी देखील आहे. यावेळी शाहरुख खान हा करणला प्रेमाने गळ्याला लावताना दिसला.

सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यामध्ये तब्बल 16 वर्षांपासून मोठा वाद हा बघायला मिळत होता. मात्र, आता जुन्या गोष्टी विसरून शाहरुख खान आणि सनी देओल एकत्र आले आहेत. गदर 2 बघितल्यानंतर शाहरुख खान याने थेट सनी देओल याला फोन करत त्याचे काैतुक केले. इतकेच नाही तर सनी देओल याच्या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीसाठीही शाहरुख खान उपस्थित राहिला.

शाहरुख खान आणि सनी देओल यांचा एका चित्रपटादरम्यान वाद झाला. यानंतर हे दोघे एकमेकांना अजिबातच बोलत नव्हते. मात्र, आता यांच्यामध्ये मैत्री बघायला मिळत आहे. शाहरुख खान आणि सनी देओल यांना एकत्र पाहून चाहतेही आनंदी झाले. शाहरुख खान यांचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शाहरुख खान दिसला.

अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.