सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर

Superstar Rajinikanth: सुपरस्टार रजनीकांत यांना मध्यरात्री रुग्णालयात करण्यात आलं दाखल, डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर..., चाहत्यांकडून चिंता व्यक्त..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रजनीकांत यांच्या प्रकृतीची चर्चा...

सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून मोठी अपडेट समोर
| Updated on: Oct 01, 2024 | 8:08 AM

Superstar Rajinikanth Health Update: सुपरस्टार रजनीकांत यांना 20 सप्टेंबर रोजी मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. रजनीकांत यांच्या पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या काही चाचण्या होणार आहेत… असं देखील सांगण्यात येत आहे. रजनीकांत रुग्णालयात आहेत कळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या सर्वत्र रजनीकांत यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.

रिपोर्टनुसार, 73 वर्षीय रजनीकांत यांच्यावर मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी हृदयाशी संबंधित काही शस्त्रक्रिया होणार आहेत. एएनआयनुसार, सोमवारी 30 सप्टेंबर रोजी रजनीकांत यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांच्या पोटात तीव्र वेदना होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे… अशी माहिती डॉक्टरांकडून मिळाली आहे.