AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार? समोर आलं मोठं कारण

निवडणूक आयोगाकडून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र आता त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

सर्वात मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार? समोर आलं मोठं कारण
निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यताImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 23, 2026 | 5:08 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.  आधी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या,  त्यानंतर महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, दरम्यान महापालिका निवडणुका झाल्यानंतर आता महापौरपदांसाठी सोडत जाहीर झाली असून, आपलाच महापौर महापलिकेत बसावा, यासाठी प्रत्येक पक्ष संख्याबळाचं गणित जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे त्यानंतर निवडणूक आयोगाकडून राज्यता जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.  निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या पाच फेब्रुवारी रोजी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.  तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे, आता त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे   जालना जिल्ह्यातल्या जवळपास 475 ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात संपत आहे, मात्र याच कालावधीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असल्यानं आणि परीक्षांचा हंगाम पाहता या ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे या गावांचा कारभार आता प्रशासकांच्या हाती जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक मोठ्या लोकसंख्येच्या गावांचा समावेश आहे, त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी निवडणुका होणे अपेक्षित आहे, मात्र याच निवडणुकीच्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्यामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांना आता प्रतिक्ष करावी लागू शकते.

राज्यात निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, जोरदार तयारी सुरू आहे. मात्र या निवडणुकीचा फटका आता ग्रामपंचायत निवडणुकीला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.