AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, रिया चक्रवर्तीला कोर्टाने बजावली नोटीस

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, रिया चक्रवर्तीला कोर्टाने बजावली नोटीस
SSR Rhea
| Updated on: Jul 29, 2025 | 9:47 PM
Share

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे. सीबीआयनं या प्रकरणी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही नोटीस रियाला पाठवण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रियानं सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आयपीसी आणि एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सीबीआयने तपास करत मार्च 2025 मध्ये हा अहवाल कोर्टात सादर केला होता. ही नोटीस कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग आहे. यामध्ये रियाला सीबीआयच्या अहवालावर आक्षेप घेण्याची संधी देण्यात आली आहे. मुंबईतील मुख्य महानगर दंडाधिकारी आर.डी. चव्हाण यांनी याप्रकरणी जारी केलेल्या नोटीसला 12 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीनं साल 2020 मध्ये सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मितु सिंग यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. यात डॉ. तरुण नथुराम यांचाही समावेश होता. या तिघांना तिने सुशांतच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. रियाने तक्रारीत आरोप केला होता की, या तिघांनी संगनमतानं सुशांतसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनने काही औषधं आणली होती.

सुशांत हा बायपोलर डिसऑर्डरनं ग्रस्त होता आणि त्याच नैराश्यात तो अनेकदा औषधे घेणे बंद करायचा, उपचारात हयगय करायचा. हा एक मानसिक आजार असल्यानं मानसोपचारतज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषध मिळणं अशक्य आहे. मात्र तरीही त्याच्या बहिणींना एका कॉल किंवा मेसेजवर ही औषधे मिळत होती. त्यासाठी या दोघी डॉक्टरच्या मदतीनं बनावट प्रिस्क्रिप्शन वापरत असल्याचा रियानं आरोप केला होता. आता यावर सीबीआयने एक अहवाल सादर केला आहे. तो रिया स्वीकारते की त्यावर आक्षेप घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, मुळचा बिहारचा रहिवासी असलेला 34 वर्षीय अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे (मुंबई) येथील अपार्टमेंटमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूचे प्रकरण अजूनही कोर्टात सुरु आहे. आता पाच वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.