AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | ‘केदारनाथ’च्या पुनर्प्रदर्शनावर चाहते नाराज, ‘आणखी किती दिवस सुशांतला विकाल?’ नेटकऱ्यांचा सवाल!

चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर काही प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

Sushant Singh Rajput | ‘केदारनाथ’च्या पुनर्प्रदर्शनावर चाहते नाराज, ‘आणखी किती दिवस सुशांतला विकाल?’ नेटकऱ्यांचा सवाल!
| Updated on: Oct 15, 2020 | 11:42 AM
Share

मुंबई : सध्या देशभरात ‘अनलॉक’चा 5वा टप्पा सुरू झाला आहे. या अंतर्गत 15 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर काही प्रदर्शित झालेले चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘केदारनाथ’ (Sushant Singh Rajput Kedarnath) या चित्रपटाचादेखील समावेश करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयावर त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करून नफा मिळवण्याच्या प्रयत्न सुरू झाल्याचे म्हणत, नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. (Sushant Singh Rajput Fans Angry on Kedarnath Re-release decision)

चित्रपट समीक्षक तराण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. चित्रपटगृह पुन्हा उघडल्यानंतर काही जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जातील, असे ट्विट करत त्यांनी सांगितले. या चित्रपटांमध्ये सुशांतच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाचा देखील समावेश करण्यात आला आहे. ‘केदारनाथ’सह ‘तान्हाजी’, ‘शुभमंगल ज्यादा सावधान’, ‘मलंग’ आणि ‘थप्पड’ हे चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केले जाणार आहेत.

चाहत्यांचा पारा चढला!

तराण आदर्श यांच्या ट्विटवर सुशांतच्या चाहत्यांनी कमेंट करत आपला राग व्यक्त केला आहे. त्यांच्या ट्विटला  उत्तर देताना एका वापरकर्त्याने लिहिले की, सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनानंतर या लोभी निर्मात्यांना एसएसआरच्या नावावर भरपूर पैसे कमवायचे आहेत. नफा मिळवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे, परंतु प्रेक्षक आता इतके मूर्ख नाहीत. ‘#Kedarnath #ShameOnBollywood’ लिहीत आपला संताप व्यक्त केला आहे. (Sushant Singh Rajput Fans Angry on Kedarnath Re-release decision)

दुसर्‍या एका वापरकर्त्याने लिहिले, ‘जेव्हा सुशांत जिवंत होता तेव्हा त्याच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाला स्क्रीन मिळत नव्हत्या आणि आता तो नसताना त्याचा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात काहीच अर्थ नाही? सुशांतला याचा फायदा होईल का? बॉलिवूडने त्याच्यासोबत खूप वाईट केले आहे.’

याचबरोबर ‘आणखी किती दिवस सुशांतला विकाल?’, असा प्रश्न करत नेटकऱ्यांनी या पुनर्प्रदर्शनाला आपला विरोध दर्शवला आहे.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput | सीबीआयवरही विश्वास नाही का?, संजय राऊतांचा सुशांतच्या वकिलांना टोला

सुशांतप्रकरण भाजपकडून हाइप; अमेरिकेच्या विद्यापीठाचा दावा: अनिल देशमुख

(Sushant Singh Rajput Fans Angry on Kedarnath Re-release decision)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.