AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | सीबीआयवरही विश्वास नाही का?, संजय राऊतांचा सुशांतच्या वकिलांना टोला

एम्सच्या अहवालानंतर सुशांतचे वकील विकास सिंह यांनी ट्विट करत, ‘एम्सचे पथक प्रत्यक्षात शरीर न पाहता असा निर्णायक अहवाल कसा देऊ शकते?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Sushant Singh Rajput | सीबीआयवरही विश्वास नाही का?, संजय राऊतांचा सुशांतच्या वकिलांना टोला
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 05, 2020 | 11:55 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी एम्सच्या (AIIMS) फॉरेन्सिक टीमने सीबीआयला आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात त्यांनी सुशांतच्या हत्येची शक्यता फेटाळून लावत, त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. या अहवालानंतर, नवीन फॉरेन्सिक पथक नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी सुशांतचे वकील विकास सिंह (Vikas Singh) यांनी केली आहे. यावर ‘आता सीबीआयवरही विश्वास नाही का?’, असे म्हणत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सुशांतच्या वकिलांना टोला लगावला आहे (Shivsena leader Sanjay Raut slams Adv Vikas singh over Sushant singh Rajput case).

‘सुशांतच्या वकिलांनी नव्या पथकाची मागणी केली आहे, करू द्या. केजीबी, सीआयएची टीम आणली तरी हरकत नाही. यांच्या या मागणीचा अर्थ, त्यांचा आता सीबीआयवरही विश्वास उरला नाहीय. सुप्रीम कोर्टवरदेखील विश्वास नाहीय. काय बोलणार आता!’, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विकास सिंह (Vikas Singh) यांना टोला लगावला आहे.

‘एका युवा अभिनेत्याचा मृत्यू होतो, ही घटना वेदनादायक आहे. त्याचा तपास नक्की करावा. आम्हाला त्यावर काहीच हरकत नाही. परंतु, पहिल्या दिवसापासून ठाकरे सरकारला, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जाते आहे’, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

‘डॉ. गुप्ता हे काही शिवसेनेचे नाहीत. त्यांनीच रिपोर्ट दिलाय, ते एम्सचे हेड आहेत. हे भाजपचेच कट कारस्थान आहे. स्वतःचे हित साधण्यासाठी हे लोक सुशांतच्या कुटुंबालाही बदनाम करत आहेत’, असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. (Shivsena leader Sanjay Raut slams Adv Vikas singh over Sushant singh Rajput case)

नव्या फॉरेन्सिक पथकाची नेमणूक करण्यात यावी : विकास सिंह

एम्सच्या अहवालानंतर सुशांतचे वकील विकास सिंह यांनी ट्विट करत, ‘एम्सचे पथक प्रत्यक्षात शरीर न पाहता असा निर्णायक अहवाल कसा देऊ शकते?’, असा प्रश्न उपस्थित केला आहे. रविवारी विकास सिंह (Vikas Singh) यांनी ट्विट केले की, ‘एम्स पथकाने सीबीआयला सादर केलेल्या अहवालामुळे (AIIMS report) मी अस्वस्थ आहे. मी सीबीआय संचालकांना नवीन फॉरेन्सिक टीम स्थापन करण्यासाठी विनंती करणार आहे.’

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, ‘एम्सची टीम मृतदेह न पाहता असा निर्णायक अहवाल कसा तयार करू शकते? तेही मुंबईतील कूपर रूग्णालयाच्या अशा पोस्टमॉर्ट अहवालावर, ज्यात मृत्यूची वेळही दिली गेली नाही.’ (Shivsena leader Sanjay Raut slams Adv Vikas singh over Sushant singh Rajput case)

सुशांतची हत्या नसून आत्महत्याच, एम्सचा दावा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) हत्या झाली नसून, हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने केला आहे. त्याचप्रमाणे या विशेष पथकाने आपला संपूर्ण अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. याआधीही एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग केला गेल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे या अहवालानंतर, सुशांतप्रकरणात हत्येचा दावा करणारे तोंडघशी पडले आहेत.

(Shivsena leader Sanjay Raut slams Adv Vikas singh over Sushant singh Rajput case)

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Rajput Case | नव्या फॉरेन्सिक पथकाची नियुक्ती करा, सुशांतच्या वकिलांची मागणी

Sushant Singh Rajput | सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा 

Sushant Singh case | ‘एम्स’च्या रिपोर्टने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट उधळला, शिवसेनेचा आक्रमक पवित्रा

Sushant Singh Rajput Case | सुशांतचा सीबीआय अहवाल लवकरात लवकर यावा; जनतेला सत्य समजलंच पाहिजे : अनिल देशमुख

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी.

इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतरही भारतीय संघाला मोठा फायदा, शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहितला मिळाली आनंदाची बातमी

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका