मला दोन दिवस आधीच अटक केली, नुकसान भरपाईपोटी 10 लाख द्या, सुशांतच्या नोकराची हायकोर्टात धाव

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Oct 06, 2020 | 6:32 PM

सुशांत सिंह राजपूत आत्म्हत्येशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला नोकर दीपेश सावंत (House Helper dipesh sawant) याने एनसीबी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे.

मला दोन दिवस आधीच अटक केली, नुकसान भरपाईपोटी 10 लाख द्या, सुशांतच्या नोकराची हायकोर्टात धाव

Follow us on

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्म्हत्येशी संबंधित ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेला नोकर दीपेश सावंत (House Helper dipesh sawant) याने एनसीबी विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. ‘आपल्याला दोन दिवस आधीच अटक केली गेली होती. मात्र,  प्रत्यक्षात जाहीर करताना अटकेचा दिवस वेगळा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे मला तात्काळ जामीन देण्यात यावा आणि 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी’, अशी मागणी त्याने याचिकेत केली आहे (Sushant Singh Rajput  House Helper dipesh sawant filed plea against NCB).

दिपेश सावंत (Dipesh Sawant) हा सुशांत सिंह राजपूत याच्या घरी नोकर (House helper) म्हणून काम करत होता. आत्महत्येच्या तपासादरम्यान, सुशांत ड्रग्स सेवन करत असल्याची बाब समोर आली होती. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतर मंडळी त्याला ड्रग्स द्यायचे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. याचवेळी घरकाम करणाऱ्या दीपेश सावंत (Dipesh Sawant) यालाही ड्रग्स स्वीकारल्या बाबत आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी, 20 ऑगस्ट रोजी एनसीबीची धडक कारवाई सुरू झाली. 28 ऑगस्टला पहिल्या आरोपीला अटक करण्यात आली. या नंतर अटकांचे सत्रच सुरू झाले. 6 सप्टेंबर रोजी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दीपेशला अटक केली.

मात्र, ‘दीपेश याला 4 सप्टेंबर रोजीच ताब्यात घेण्यात आले होते. प्रत्यक्ष जाहीर करताना मात्र सदर अटक उशिरा दाखवण्यात आली. तसेच, दीपेशला अटक करताना अनेक कायद्यांचे उल्लंघन करण्यात आले आहे’, असे नमूद करत दीपेशचे वकील राजेंद्र राठोड यांनी एनसीबी विरोधात ही याचिका दाखल केली आहे. (Sushant Singh Rajput  House Helper dipesh sawant filed plea against NCB)

रिया चक्रवर्तीला दिलासा नाहीच!

दरम्यान, ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने तिसऱ्यांदा फेटाळला असून, तिच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, अब्दूल बासित परिहार, दीपेश सावंत, जैद विलंतरा आणि सॅम्युअल मिरांडा यांना आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सत्र न्यायालयात हजर केले होते. या सर्वांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत होती. त्यावर आज कोर्टात सुनावणी झाली असता, रियासह या सर्वांच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाचा तपास करताना सीबीआयच्या चौकशीत ड्रग्जचा अँगल समोर आला होता. त्यानुसार एनसीबीने याप्रकणी चौकशी सुरू केली होती. त्यात हे दोघेही ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात असल्याचे आढळून आले होते. हे दोघेही सॅम्युअल मिरांडाच्या माध्यमातून डॅग्ज खरेदी करून सुशांतला देत होते. दरम्यान, ड्रग्जप्रकरणी एनसीबीने आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे. त्याशिवाय ड्रग्जप्रकरणी दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकूलप्रीत सिंह सारख्या बड्या कलाकारांचीही चौकशी करण्यात आली होती.

(Sushant Singh Rajput  House Helper dipesh sawant filed plea against NCB)

संबंधित बातम्या : 

रिया चक्रवर्तीचा कोठडीतील मुक्काम वाढला; तिसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI