AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, अभिनेत्याचे जुने चॅट व्हायरल, पाहून व्हाल थक्क

Sushant Singh Rajput | सुशांत सिंग राजपूत मृत्यूच्या दोन दिवस आधी होता प्रचंड त्रस्त, अभिनेत्याचे जुने चॅट सर्वत्र तुफान व्हायरल, पाहिल्यानंतर तुम्हाला देखील बसेल धक्का..., 14 जून 2020 मध्ये सुशांत याचं निधन झालं. पण अभिनेत्याने का इतकं मोठं पाऊल उचललं?

सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, अभिनेत्याचे जुने चॅट व्हायरल, पाहून व्हाल थक्क
| Updated on: May 06, 2024 | 2:38 PM
Share

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथे असलेल्या राहत्या घरात स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या निधानंतर सर्वत्र तुफान खळबळ माजली होती. बॉलिवूड आणि सोशल मीडियावर देखील खळबळ माजली होती. अभिनेत्याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहे. पण तरी देखील अद्याप अभिनेत्याच्या निधनाचं खरं कारण समोर आलं नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुलाखतीत सुशांत याची बहीण श्वेता यांनी सुशांत याच्या खोलीबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं होतं. आता अभिनेत्याचे चॅट समोर आले आहेत.

सुशांत याची बहीण म्हणाली, ‘सुशांत याचा निधनाच्या 4 दिवसांपूर्वी काही वाईट होणार आहे असं वाटलं होतं.’ अभिनेत्याच्या मृत्यूच्या 4 दिवसांपूर्वी श्वेता यांनी सुशांत याला कॅलिफोर्निया येथे स्वतःकडे बोलावून घेतलं होतं. श्वेता हिने एक मेसेज करत अभिनेत्याला बोलावून घेतलं होतं. यावर सुशांत म्हणाला होता, ‘मलासुद्धा यायचं आहे दीदी…’ पण तेव्हा जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला होता.

सुशांत आणि श्वेता यांचे काही चॅट सध्ये सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत आहेत. अभिनेत्याची बहीण म्हणाली होती, ‘मला आजही पश्चाताप होत आहे.. मी त्याला काय झालं आहे सतत विचारलं असतं तर, आजचा दिवस वेगळा असता… सुशांत आज जिवंत असता. 12 जून रोजी सुशांत याच्यासोबत शेवटचं बोलणं झालं. तो त्रासलेला होता.’ असं देखील अभिनेत्याची बहीण म्हणाली आहे.

सांगायचं झालं तर, श्वेता कायम अभिनेत्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर सुशांत याने इतकं मोठं पाऊल का उचललं? यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अभिनेत्याने फार कमी काळात चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

सुशांत सिंह राजपूत फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिला. अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यानंतर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत सुशांत याच्या नावाची चर्चा रंगली. सुशांत याचं निधन झालं तेव्हा तो अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला डेट करत होता.

सुशांत याच्या निधनानंतर रिया हिला देखील अनेक संकटांचा सामना करावा लागला. रिया आणि तिच्या भावाला सुशांत केस प्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला होता. सुशांत याच्या मृत्यू नंतर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान