AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput: ‘सुशांतसोबत काय झालं आम्हाला…’, अभिनेत्याच्या बहिणीचा थक्क करणारा व्हिडीओ

Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अद्यापही सावरले नाहीत त्याचे कुटुंबिय, अभिनेत्याच्या निधनाचं खरं कारण... अभिनेत्याच्या निधनाला तीन वर्ष.... सुशांत याच्या बहिणीने सीबीआयकडे केली मोठी मागणी...

Sushant Singh Rajput: 'सुशांतसोबत काय झालं आम्हाला...', अभिनेत्याच्या बहिणीचा थक्क करणारा व्हिडीओ
| Updated on: Feb 04, 2024 | 3:01 PM
Share

मुंबई | 4 फेब्रुवारी 2024 : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत. तरी देखील अभिनेत्याच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुशांत याच्या बहिणीने मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्याची बहीण म्हणाली, ‘आम्हाला जाणून घ्यायचं आहे, आमच्या भावाला कोणी मारलं. त्याच्यासोबत काय झालं. जो पर्यंत आम्हाला सत्य कळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. म्हणून आम्हाला सत्य शोधून काढायचं आहे. आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आवाज बुलंद करावा लागेल… सीबीआयने चौकशी करावी आणि लवकरात लवकर सत्य समोर आणावं. अशी आमची मागणी आहे…’ सध्या सर्वत्र सुशांत याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

सुशांत याच्या निधनामुळे सेलिब्रिटींसह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याची बहीण श्वेता सिंह किर्ती कायम सुशांत याच्याबद्दल मोठं वक्तव्य करत असते. सुशांत याच्या निधनानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या..

सुंशात डिप्रेशनचा सामना करत होता… रिपोर्टनुसार, सुशांत डिप्रेशनसाठी औषधं घेत होता. सुशांत याचं नाव ड्रग्ज केससोबत देखील जोडण्यात आलं होतं. एवढंच नाही तर, अभिनेत्याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणी अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला आणि तिच्या भावाला तुरुंगात जावं लागलं होतं.

सुशांत याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून प्रसिद्धी मिळाल्यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. सोशल मीडियावर देखील सुशांत याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सुशांत फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होता.

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासोबत असलेलं नातं देखील चाहत्यांमध्ये चर्चेत होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर सात वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सुशांत याचं निधन झालं असलं तरी, चाहते अभिनेत्याला विसरु शकलेले नाहीत. त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच