AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिस युनिव्हर्सने मुंबईतील अलिशान अपार्टमेंट दिले भाड्याने, दर महिन्याला मिळणार तब्बल इतकं भाडं

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने गोरेगाव येथील तिचे आलिशान अपार्टमेंट महिन्याला सुमारे २ लाखांच्या भाड्याने दिले आहे. तीन वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे.

मिस युनिव्हर्सने मुंबईतील अलिशान अपार्टमेंट दिले भाड्याने, दर महिन्याला मिळणार तब्बल इतकं भाडं
sushmita sen
| Updated on: Mar 02, 2026 | 2:48 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत रेंट कल्चरचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांचे घर भाड्याने दिल्याची माहिती समोर आली होती. आता या यादीत बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनचाही समावेश झाला आहे. सुष्मिता सेनने तिचे गोरेगावचे अलिशान अपार्टमेंट भाड्याने दिले आहे. यामुळे सध्या ती चर्चेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुष्मिता सेन आणि तिची आई शुभ्रा सेन यांनी मुंबईतील गोरेगाव या उच्चभ्रू परिसरात असलेले त्यांचे आलिशान अपार्टमेंट भाड्याने देत एक महत्त्वाचा करार केला आहे. सुष्मिता सेनने भाड्याने दिलेले हे अपार्टमेंट गोरेगाव (पूर्व) येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला लागून असलेल्या ओबेरॉय एक्झिक्युझिट (Oberoi Exquisite) या अत्यंत प्रतिष्ठित गृहप्रकल्पात आहे. या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ १,२४१ चौरस फूट (कार्पेट एरिया) असून ते इमारतीच्या १२ व्या मजल्यावर आहे.

किती मिळणार भाडं?

सुष्मिता सेनचे हे घर अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज आहे. या घरासोबत भाडेकरूला दोन पार्किंग जागाही वापरण्यासाठी मिळणार आहेत. रिअल इस्टेट फर्म ‘स्क्वेअर यार्ड्स’च्या अहवालानुसार, सुष्मिता सेन आणि तिच्या आईने हे अपार्टमेंट तीन वर्षांच्या करारावर भाड्याने दिले आहे. या कराराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी हे भाडे ५ टक्क्यांनी वाढवण्याची अट घालण्यात आली आहे. या अपार्टमेंटचे पहिल्या वर्षासाठी दर महिन्याचे भाडे १.९५ लाख निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर, दुसऱ्या वर्षी यात वाढ होऊन ते ₹२.०४ लाख प्रति महिना होईल आणि तिसऱ्या व शेवटच्या वर्षी हे भाडे २.१४ लाख प्रति महिना इतके असेल.

या तीन वर्षांच्या एकूण कालावधीत सुष्मिता सेन यांना भाड्यापोटी एकूण ७३.७६ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. याशिवाय मालमत्तेच्या सुरक्षेसाठी भाडेकरूकडून ६ लाखांची अनामत रक्कम (Security Deposit) देखील घेण्यात आले आहे. हा व्यवहार अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडला असून २६ फेब्रुवारी २०२६ रोजी याची अधिकृत नोंदणी करण्यात आली. अधिकृत कागदपत्रांनुसार, या करारासाठी १८,९०० स्टॅम्प ड्युटी आणि १,००० नोंदणी फी भरण्यात आली आहे.

ओबेरॉय एक्झिक्युझिटला पसंती

दरम्यान गोरेगावमधील ओबेरॉय एक्झिक्युझिट हे कॉम्पलेक्स सेलिब्रिटींच्या पसंतीस उतरत आहे. याची उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मुंबई मेट्रोच्या जवळ असल्यामुळे मालाड, अंधेरी आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) यांसारख्या प्रमुख ठिकाणी पोहोचणे सोपे होते. यामुळेच या ठिकाणी घरं भाड्याने घेण्यासाठी अनेक जण गर्दी करताना दिसतात.

Follow Us
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच शिंदेंचं ओमराजेंबाबत मोठं विधान
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर पोहोचण्याआधीच...
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपटाचा First Look समोर
6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी
मोठी घडामोड! 6 खासदार गेलेच, आता ते 3 आमदारही नाराज? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला मारली दांडी!
पक्ष प्रवेशापूर्वीच शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
Omraje Nimbalkar | पक्ष प्रवेशापूर्वीच मोठं घडलं; शिंदेकडून ओमराजेंना मोठं गिफ्ट? थेट दिल्लीत...
शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे-मींदे बाळंत झालेत, 6 गद्दारांना जन्म दिला, नंदनवनात पाळणा...शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या
उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेलेही त्यांनी फसवतायेत? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
मोठी बातमी! 6 खासदारांनंतर आणखी मोठा धक्का; ऑपरेशन टायगर 2 पण होणार, शिंदेंच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याने दिले मोठे संकेत
उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
Thackeray MLA Meeting | उद्धव ठाकरेंची 20 आमदारांसोबत बैठक, बैठकीला कोण हजर अन् कोण गैरहजर?
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील
कोणाला माहितीच नाही! ओमराजेंना अचानक रात्री 2 वाजता... शिंदे गटातील बड्या नेत्याने सांगितलं त्या भेटीगाठीचं गुपित