AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्त्रींसाठी त्यांचा आत्मन्मान…, जौहरवर स्वरा भास्करचं वादग्रस्त वक्तव्य, अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

Amruta Fadnavis on Swara Bhaskar Statement : अभिनेत्री स्वरा भास्कर हिने 'पद्मावत' सिनेमातील जौहरच्या सीनवर वादग्रस्त वक्तव्य केलेलं. आता अभिनेत्रीच्या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्त्रींसाठी त्यांचा आत्मन्मान..., जौहरवर स्वरा भास्करचं वादग्रस्त वक्तव्य, अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
| Updated on: Sep 09, 2026 | 3:08 PM
Share

Amruta Fadnavis on Swara Bhaskar Statement : दिल्लीत झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री स्वरा भास्कर हिने दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ सिनेमातील जौहर सिनेमावर वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे स्वरा हिच्यावर अनेकांनी टीका केली. फक्त नेटकऱ्यांनी यांनीच नाही तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील स्वरा हिच्यावर निशाणा साधला. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वरा भास्कर हिच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मला त्यांना कोणतंच उत्तर द्यायचं नाही. त्यांनी त्यांचा दृष्टिकोन आणि मत मांडलं आहे. पण, मला असं वाटतं की, प्रत्येक स्त्रीसाठी तिचा आत्मसन्मान हा सर्वांत महत्त्वाता असतो. आताचा जो काळ आहे, तो फार वेगळा आहे… त्यामुळे तुम्ही आताच्या काळाची आणि त्या काळाची तुलना शकत नाही…’

पुढे अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘त्या काळात त्यांना त्या प्रकारे आपला आत्मसन्मान राखला जाऊ शकतो… असं वाटलं म्हणून त्यांनी इतकं मोठं बलिदान दिलं… तेव्हा पोलीस, न्याय आणि न्यायालय नव्हतं… खिलजीच्या हाती लागण्यापेक्षा स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करणं, हे त्यांनी अधिक योग्य वाटलं… त्यामुळे तेव्हा जे काही घडलं, त्याची तुलना आपण आता करु शकत नाही… आज तुमच्या पाठीशी न्याय – व्यवस्था पोलीस, समाज उभा आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांची तुलना होऊच शकत नाही.’, अमृता फडणवीस असं देखील म्हणाल्या.

काय म्हणाली स्वरा भास्कर?

‘पद्मावत’ सिनेमातील ‘जौहर’च्या सीनबद्दल बोलताना स्वरा भास्कर म्हणाली, सिनेमा पाहिल्यानंतर तिने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना एक खुलं पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये 800 महिलांच्या जौहरच्या सीनवर निशाणा साधला, या सीनची तुलना अभिनेत्रीने बलात्कार पीडितांसोबत केली आणि प्रश्न उपस्थित केला की, जर कोणत्या महिलेवर बलात्कार झाला असेल, तर तिचं आयुष्य संपायला पाहिजे? स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी स्वतःला संपवणं किती योग्य आहे? बलात्कार होणं महिलेच्या आयुष्याचा अंत आहे का? असे प्रश्न स्वरा भास्कर हिने उपस्थित केले.

Follow Us
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप...
धक्कादायक! काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण... अहिल्यानंगरमध्ये थरकाप उडवणारा प्रकार
श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
Shreyas Talpade | श्रेयस तळपदेंचं DJ बंदीवर मोठं वक्तव्य; सण साजरे करा, पण...
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण...रोहित पवार काय म्हणाले
भाजपची साथ सोडली तर राष्ट्रवादीसोबत विलीनीकरण... रोहित पवार असं काय म्हणाले?
नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन
Nagothane Bridge Issue | नागोठणेचा उड्डाणपूल पुन्हा चर्चेत! सिमेंटच्या प्लेट्सना काचेचा आधार अन्...; व्हिडिओ व्हायरल
अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; शेतकरी हवालदिल
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले...
Solapur | सोलापुरात शोले स्टाईल आंदोलन! मराठा तरुण पाण्याच्या टाकीवर चढले; नेमक्या मागण्या काय?
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं..
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क... जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?