जेठालाल नाही तर बाघासोबत दिसली ‘दयाबेन’; चेहऱ्यावरील नाराजी पाहून चाहत्यांकडून काळजी व्यक्त

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 9:52 AM

सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमध्ये दिशा वकानी ही बाघा म्हणजेच अभिनता तन्मय वेकारियासोबत पहायला मिळतेय. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत.

जेठालाल नाही तर बाघासोबत दिसली 'दयाबेन'; चेहऱ्यावरील नाराजी पाहून चाहत्यांकडून काळजी व्यक्त
Disha Vakani
Image Credit source: Instagram

मुंबई: छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही गेल्या 15 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत झालेल्या काही बदलांमुळे त्याची लोकप्रियता कमी होत असल्याचं पहायला मिळतंय. आतापर्यंत यातील बऱ्याच कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. यात दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा भव्य गांधी आणि राज अनाडकत, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा यांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शकांनीही ही मालिका सोडली. त्यामुळे मालिकेचा प्रेक्षकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी निर्माते बरेच प्रयत्न करत आहेत. अशातच सोशल मीडियावरील एका व्हायरल फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमध्ये दिशा वकानी ही बाघा म्हणजेच अभिनता तन्मय वेकारियासोबत पहायला मिळतेय. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित होत आहेत. मालिकेत दयाबेन परतणार आहे का, असा प्रश्न काहींना पडला आहे. तर हा फोटो नेमका कधीचा आहे, असा सवाल काही नेटकरी करत आहेत.

दिशा वकानी आणि तन्मयचा हा फोटो पाहिल्यानंतर मालिकेत लवकरच दयाबेनची एण्ट्री होणार, असाही अंदाज वर्तवला जात आहे. मात्र या फोटोचं सत्य वेगळंच आहे. दिशा आणि तन्मयचा हा फोटो तारक मेहताच्या मालिकेतील नाही, तर रंगभूमीवरील आहे.

दिशा आणि तन्मय हे मालिकेत काम करण्यापूर्वी रंगभूमीवर काम करायचे. बऱ्याच वर्षांनंतर त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिशाने 2017 मध्येच ही मालिका सोडली होती. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली दिशा पुन्हा मालिकेत परतलीच नाही. तिला मालिकेत परत आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र दिशा सध्या तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI