AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dayaben: हे माँ माताजी! दयाबेनची अवस्था पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली काळजी, व्हिडीओ व्हायरल

दिशाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. नेमकं तिच्यासोबत काय घडलंय, हेच त्यांना समजत नाहीये. दिशाची अवस्था पाहून चाहते काळजी व्यक्त करत आहेत.

Dayaben: हे माँ माताजी! दयाबेनची अवस्था पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केली काळजी, व्हिडीओ व्हायरल
Disha VakaniImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 12, 2023 | 1:57 PM
Share

मुंबई: गेल्या काही महिन्यांत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून बऱ्याच कलाकारांनी निरोप घेतला. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शकांनीही या मालिकेला रामराम केला. त्यामुळे छोट्या पडद्यावरच्या या लोकप्रिय मालिकेचा टीआरपी घसरल्याची चर्चा सुरू झाली. ही मालिका पुन्हा रुळावर आणण्यासाठी त्यात नवीन कलाकारांची एण्ट्री होणार असल्याचं कळतंय. त्यात दयाबेनचीही भूमिका पुन्हा मालिकेत येणार असल्याचं समजतंय. या चर्चांदरम्यान मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानी हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिशाचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. नेमकं तिच्यासोबत काय घडलंय, हेच त्यांना समजत नाहीये. दिशाची अवस्था पाहून चाहते काळजी व्यक्त करत आहेत. या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय ते जाणून घेऊयात..

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये दिशा एका लहान बाळाला घेऊन उभी असल्याचं दिसतंय. त्याचसोबत ती तिची दु:खद कहाणी सांगत रडतेय. दिशाच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

दिशाचा हा व्हिडीओ एका चित्रपटातील आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सी कंपनी’ या चित्रपटातील हा व्हिडीओ आहे. यामध्ये तुषार कपूर, मिथुन चक्रवर्ती आणि अनुपम खेर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तुषारने यात पत्रकाराची भूमिका साकारली आहे तो दिशाची दु:खद कहाणी सर्वांना सर्वांसमोर आणतोय.

‘तारक मेहता मालिकेत परत ये’ असं एकाने या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये लिहिलंय. तर ‘हे खरं आहे का’ असा सवाल दुसऱ्या युजरने केला आहे. दिशाने बाळंतपणासाठी मालिकेतून ब्रेक घेतला होता. 2017 मध्ये तिची मालिकेतून एग्झिट झाली, मात्र पुन्हा ती परतलीच नाही. दिशाला मालिकेत परत आणण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.