AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तारक मेहता… फेम टप्पू अडकणार लग्नबंधनात? ‘बबीता’ सोबतच्या नात्यावर राज अनादकट म्हणाला…

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम टप्पूच्या घरात लगीन घाई, अभिनेता अडकणार लग्नबंधनात? 'बबीता' सोबतच्या नात्यावर राज अनादकट यांच्याकडून मोठा खुलासा, अभिनेता कायम असतो चर्चेत

तारक मेहता... फेम टप्पू अडकणार लग्नबंधनात? 'बबीता' सोबतच्या नात्यावर राज अनादकट म्हणाला...
| Updated on: Oct 14, 2024 | 8:15 AM
Share

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मधल्या काळात अनेक कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला, पण चाहत्यांमध्ये त्यांची आजही चर्चा रंगलेली असते. अशात अभिनेत्यांपैकी एक म्हणजे मालिकेत टप्पू ही भूमिका साकारणार अभिनेता राज अदानकट… राज याने मालिकेत 5 वर्ष काम केलं आणि 2022 मध्ये अभिनेत्याने मालिकेचा निरोप घेतला. सध्या ‘युनाइटेड स्टेट ऑफ गुजरात’ या नाटकासाठी काम करत आहे.

राज याने एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली नसली तरी, खासगी आयुष्यामुळे अभिनेता कायम चर्चेत असते. एक काळ असा होता जेव्हा मालिकेत बाबिता जी ही भूमिका साकारणी अभिनेत्री मूनमून दत्ता हिच्यासोबत राज याच्या नावाची चर्चा रंगली होती. मूनमून आणि राज यांच्यामध्ये जवळपास 10 वर्षांचं अंतर आहे. ज्यामुळे दोघांना ट्रोल देखील करण्यात आलं.

दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राज याने स्वतःच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केली आहे. मूनमून दत्ता हिच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन बाळगतं अभिनेत्याने ‘माझ्या आईला माझ्या लग्नासाठी स्वयंवरचं आयोजन करायचं आहे…’ असं अभिनेता म्हणाला.

रिपोर्टनुसार, राज आणि मूनमून दत्ता रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. पण दोघांनी देखील नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही. यावर मूनमून दत्ता हिला देखील विचारण्यात आलं होतं. तेव्हा अभिनेत्रीने रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं होतं.

नुकताच झालेल्या मुलाखतीत राज याने मूनमून सोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं. अभिनेता म्हणाली, ‘मूनमून बद्दल मला काहीही बोलायचं नाही. मी कधीच तिच्याबद्दल काहीच बोललो नाही. आता मला फक्त माझ्या करियरवर लक्ष द्यायचं आहे. जेव्हा माझ्या खासगी आयुष्यात काही महत्त्वाचं घडणार असेल तेव्हा मी सर्वांना नक्की सांगेल.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

राज अदनाकट याचं स्वयंवर…

स्वतःच्या लग्नाबद्दल अभिनेता म्हणाला, ‘माझ्या आईला माझ्यासाठी स्वयंवरचं आयोजन करायचं आहे. मी अद्याप माझ्या करियरमध्ये फार काही केलं नाही. पण जेव्हा लग्नाची वेळ येईल तेव्हा मला समजणारी जोडीदार मला हवी आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला. राज सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ