TMKOC | ‘तारक मेहता…’च्या ‘रीटा रिपोर्टर’चा बिकिनीत जलवा, समुद्र किनाऱ्यावरचे फोटो शेअर करत म्हणाली…

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘रीटा रिपोर्टर’ म्हणजेच अभिनेत्री प्रिया आहूजा-राजदा सध्या तिच्या बिकीनी फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

TMKOC | ‘तारक मेहता...’च्या ‘रीटा रिपोर्टर’चा बिकिनीत जलवा, समुद्र किनाऱ्यावरचे फोटो शेअर करत म्हणाली...
प्रिया अहुजा
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 8:50 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘रीटा रिपोर्टर’ म्हणजेच अभिनेत्री प्रिया आहूजा-राजदा सध्या तिच्या बिकीनी फोटोंमुळे चर्चेत आली आहे. प्रिया आहूजाने तिचे बिकीनी फोटो तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर बिकीनी फोटो पोस्ट करत तिने या माध्यमातून बॉडी शेमिंगबद्दल एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने गरोदरपणानंतर तिचे शरीर कसे बदलले आहे आणि ती आता कशी दिसते, याबद्दल सांगितले आहे. तथापि, शरीरात बदल झाले असूनही, मी खूप आनंदी आहे आणि मला माझ्या शरीराचा अभिमान आहे, असे देखील तिने म्हटले आहे (Taarak Mehta Ka ooltah chashmah fame rita reporter actress priya anhuja flaunt bikini photo on social media).

अभिनेत्री प्रिया आहूजा लिहिते की, ‘होय मी हसत आहे, कारण आता माझ्याकडे पूर्वीसारखे शरीर नाही. माझ्या शरीरावर बरेच स्ट्रेच मार्क्स आहेत, माझी चामडीही सैल झाली आहे आणि मी थोडाशी जाडही झाले आहे. पण, याबद्दल मी खूप आनंदी आहे. इतकेच नाही, तर मला माझ्या शरीराचा अभिमान आहे की, मी एका बाळाला जन्म दिला आहे. माझे पोट 9 महिन्यांसाठी एका जीवाचे घर होते. माझ्या शरीराने त्याची सगळी काळजी घेतली.’

पाहा प्रियाचे फोटो :

(Taarak Mehta Ka ooltah chashmah fame rita reporter actress priya anhuja flaunt bikini photo on social media)

… तरीही माझे शरीर खूप सुंदर आहे!

प्रिया पुढे लिहिते की, ‘गर्भधारणेमुळे माझे शरीर पूर्णपणे बदलले. तथापि, दीड वर्षानंतरही, अद्याप माझे शरीर पूर्णपणे बरे होऊ शकलेले नाही. पण मला वाटते की, ते अजूनही खूप सुंदर आहे.’ प्रिया पुढे असे म्हणते की, मुलाला जन्म देणाऱ्या आणि स्वतःच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्व देणाऱ्या सर्व मातांना सलाम’.

या फोटोमध्ये प्रिया निळ्या आणि पांढर्‍या चेक्सच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. मालदीवच्या समुद्र किनाऱ्यांवर उभे राहत तिने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. दुसर्‍या फोटोमध्ये, ती आपला मुलगा अरदाससोबत बसलेली दिसत आहे. फोटोत, तिचा मुलगा वाळूशी खेळत जमिनीवर बसलेला आहे. या फोटोंमध्ये प्रिया एकदम सध्या लूकमध्ये दिसत आहे. शिवाय तिने मेकअपही केलेला नाही. तिची व्यक्त होण्याची ही शैली तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. लोक कमेंट करताना अभिनेत्रीच्या फोटो आणि कॅप्शन दोन्हीची प्रशंसा करत आहेत (Taarak Mehta Ka ooltah chashmah fame rita reporter actress priya anhuja flaunt bikini photo on social media).

सोशल मीडियावर सक्रिय प्रिया

अभिनेत्री प्रिया आहूजाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे दिग्दर्शक मलक राजदाशी लग्न केले आहे. प्रिया आहूजा-राजादाने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगा अरदास याला जन्म दिला होता. प्रिया अनेकदा तिचे प्रेग्नन्सी फोटो पोस्ट करत असते. मुलगा अरदासच्या जन्मानंतर तिने चाहत्यांसह मुलाची अनेक छायाचित्रेही शेअर केली आहेत.

(Taarak Mehta Ka ooltah chashmah fame rita reporter actress priya anhuja flaunt bikini photo on social media)

हेही वाचा :

Video | ‘वाजले की बारा’ म्हणणारी अमृता खानविलकर अशी ठेवते स्वतःला फिट! पाहा तिचा योगा व्हिडीओ…

Non Stop LIVE Update
अमित ठाकरे पुणे लोकसभा लढवणार? म्हणाले, माझी निवडणूक लढण्याची इच्छा...
अमित ठाकरे पुणे लोकसभा लढवणार? म्हणाले, माझी निवडणूक लढण्याची इच्छा....
मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका,हायकोर्टात काय झाला युक्तिवाद?
मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका,हायकोर्टात काय झाला युक्तिवाद?.
जरांगेंच्या भाषेत गुरमी, वडेट्टीवारांच्या टीकेवर एकेरी भाषेत पलटवार
जरांगेंच्या भाषेत गुरमी, वडेट्टीवारांच्या टीकेवर एकेरी भाषेत पलटवार.
सूनेच्या पक्षात सासरे येणार? रक्षा खडसेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
सूनेच्या पक्षात सासरे येणार? रक्षा खडसेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण.
मारूतीच्या शेपटीवरून जुंपली, भुजबळांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर
मारूतीच्या शेपटीवरून जुंपली, भुजबळांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर.
लग्नात लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौतीसारख, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
लग्नात लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौतीसारख, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?.
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य.
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.