AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तमन्ना भाटियाचा ‘हा’ हॉरर चित्रपट पाहण्याची चूक करू नका; डोकं धरून बसाल; तमन्नाही यामुळे झालीये ट्रोल

तमन्ना भाटिया सध्या विजय वर्मासोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. लग्नाच्या मुद्द्यावरून झालेल्या मतभेदाने हे जोडपे वेगळे झाल्याचं म्हटलं जात आहे. पण याच निमित्ताने तमन्नाचे जुने चित्रपट ट्रेंडमध्ये यायला लागले आहेत. त्यातील तिचा एक हॉरर चित्रपट ज्याची चर्चा अजूनही होत आहे. पण चांगल्या अर्थाने नाही तर नकारात्मक बाजूने. या चित्रपटामुळे तमन्नाला खूप ट्रोलही करण्यात आलं होतं.

तमन्ना भाटियाचा 'हा' हॉरर चित्रपट पाहण्याची चूक करू नका; डोकं धरून बसाल; तमन्नाही यामुळे झालीये ट्रोल
Tamannah Bhatia's flop film "Khamoshi"Image Credit source: tv9 hindi
| Updated on: Mar 12, 2025 | 7:00 PM
Share

तमन्ना भाटिया सध्या विजय वर्मासोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. सुमारे 2 वर्षे एकत्र राहिल्यानंतर हे जोडपे वेगळे झाले. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तमन्ना भाटियाचे विजय वर्मासोबत ब्रेकअप होण्याचे कारण लग्न आहे. तमन्नाला लग्न करण्याची इच्छा आहे पण विजय अजून लग्न करण्यास तयार नसल्यानं त्यांच्यात वाद होत होते त्यामुळे त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून त्यांचं प्रेमाचं नातं संपवण्याचा निर्ण घेतल्याचं म्हटलं जात आहे.

तमन्नाचा हा चित्रपट कोणीच पाहू शकणार नाही 

तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेली तमन्ना भाटिया गेल्या वर्षी ‘स्त्री 2चित्रपटातील तिच्या अद्भुत आयटम सॉन्गमुळेही चर्चेत होती. तमन्नाचा असा एक चित्रपट तुम्हाला माहितीये का? की तो चित्रपट कोणीच पाहू शकणार नाही. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हीही तुमचे डोके धराल. 2019 मध्ये तमन्ना भाटियाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्यामध्ये ती एका प्रसिद्ध साउथ अभिनेत्यासोबत दिसली होती. दोन मोठ्या स्टार्सची भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र जोरात आपटला होता. या चित्रपटाची अवस्था इतकी वाईट होती की निर्मातेही काळजीत पडले.

‘खामोशी’ हॉरर-ड्रामा चित्रपट

हा चित्रपटाचं नाव आहे ‘खामोशी’. तमन्ना भाटिया प्रभु देवासोबत ‘खामोशी’ या हॉरर-ड्रामा चित्रपटात दिसली होती. भूमिका चावला, मुरली शर्मा, विक्रम भट्ट यांच्यासह अनेकांनी यात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तमन्नाच्या अपोजिट प्रभू देवा मुख्य भूमिकेत होता. तमन्ना भाटियाने ‘खामोशी’ चित्रपटात एका मूकबधिर मुलीची भूमिका केली होती. जी तिच्या घरात एकटीच राहत असते. ती मुलगी वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेचा वापर लोकांच्या कल्याणासाठी करण्याचा विचार करत असते. या निर्णयामुळे ती अडचणीत येते. सुरभीची भूमिका साकारणारी तमन्ना भाटिया खडतर संघर्ष करून खुनीपासून आपला बचाव करताना या चित्रपटात पाहायला मिळत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात मात्र अपयशी ठरला आहे.

तमन्नालाही बरंच ट्रोल केलं गेलं 

या हिंदी चित्रपटाचे प्रमोशन चक्री तोलेती यांनी केलं होतं. वाशु भगनानी यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाचे बजेट 6 कोटी होते. मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काहिच कमाई केली नाही. पण चित्रपटाचा खर्च तेवढा वसूल केला होता. तमन्ना भाटियाच्या या चित्रपटावर समीक्षकांनीही बरीच टीका केली. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय किंवा कथानक प्रेक्षकांना प्रभावित करू शकले नाही. या चित्रपटाला 3.4 रेटींग देण्यात आलं आहे. या चित्रपटाला अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 3.4 रेटिंग मिळाले आहे.

त्यामुळे या चित्रपटाबद्दल अजूनही बऱ्याच चर्चा होताना पाहायला मिळतात. दरम्यान ‘खामोशी’ हा तमन्ना भाटियाच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. तमन्नाची प्रभुदेवासोबतची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना विशेष आवडली नव्हती.

निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....