AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्रीला मृत्यूनंतरही नाही मिळाला आदर… जीवन संपवण्याच्या काही तास आधी तिच्यासोबत काय घडलेलं?

Actress Life : नवऱ्याकडून मारहाण... घरातून पळालेल्या अभिनेत्रीला मृत्यूनंतरही नाही मिळाला आदर..., जीवन संपवण्याच्या काही तास आधी अभिनेत्रीसोबत नक्की काय घडलेलं... धक्कादायक आहे घटना...

अभिनेत्रीला मृत्यूनंतरही नाही मिळाला आदर...  जीवन संपवण्याच्या काही तास आधी तिच्यासोबत काय घडलेलं?
अभिनेत्री सिल्क स्मिता
| Updated on: Dec 06, 2025 | 4:03 PM
Share

Actress Life : बॉलिवूडमध्ये काही अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी अभिनय विश्वात स्वतःची ओळख तर निर्माण केली. पण खासगी आयुष्यात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. असंच काही एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं… सुरुवातील अभिनेत्रीचं मेकअप करणारी मुलगी.. प्रसिद्ध अभिनेत्री होते… 10 वर्षात तब्बल 500 सिनेमांमध्ये काम करते आणि स्वतःचं नाव मोठं करते. पण जेव्हा अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर येते तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो… वयाच्या 36 वर्षी यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर तिने स्वतःचं आयुष्य संपवलं.. पण शेवटच्या तिच्यासोबत काय घडलं हे जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल…

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सिल्क स्मिता आहे. लहान असताना तिने अभिनेत्री होण्याचा स्वप्न पाहिलं होतं… पण कुटुंबियांनी तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न केलं. तिचे सासरचे लोक तिला त्रास देत होते. नवऱ्याकडून होणारा छळ आणि टोमण्यांना कंटाळलेली स्मिता एके दिवशी संधी साधून चेन्नईमध्ये एका मावशीकडे राहण्यासाठी घरातून पळून गेली.

त्यानंतर तिने सिनेमांमध्ये अभिनेत्रींचं मेकअप करण्याचं काम केलं… सुरुवातील ती अभिनेत्रींचं टचअप करायची… काम करता करता तिने निर्मात्यांसोबत मैत्री केली… आणि 1979 मध्ये मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. प्रत्येक निर्मात्याने आणि दिग्दर्शकाने त्यांच्या सिनेमात सिल्क स्मिताचं गाणं समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिने कमल हासनपासून रजनीकांतपर्यंत सर्वांसोबत काम केलं.

सिल्क स्मिता हिला मोठ्या पडद्यावर यश तर मिळालं तर कोणाची साथ मिळाली नाही. सिल्क स्मिता एकाकीपणाशी झुंजत होती. तिच्याकडे स्वतःचं कुटुंब आणि जोडीदार देखील नव्हता.. ज्यामुळे अभिनेत्री कायम नशेत राहू लागली आणि 23 नोव्हेंबर 1996 मध्ये सिल्क स्मिता हिने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला.

मृत्यूच्या काही तास आधी सिल्क स्मिता हिच्यासोबत काय घडलं होतं..

रिपोर्टनुसार, सिल्क स्मिता हिच्या मृत्यूच्या काही तास आधी कन्नड अभिनेता आणि जवळचा मित्र रविचंद्रन याला फोन केला होता.23 नोव्हेंबर 1996 रोजी स्मिता हिने रविचंद्रन यांना अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचं बोलणं होऊ शकलं नाही.. कारण रविचंद्रन शुटिंगमध्ये होते… एका मुलाखतीत रविचंद्रन म्हणालेले, ‘त्यानंतर मी देखील फोन करण्याचा प्रयत्न केला. पण नेटवर्क नसल्यामुळे बोलणं होऊ शकलं नाही…’ त्यानंतर दुसऱ्या दिवशीच सिल्क स्मिता हिचं निधन झाल्याची माहिती सर्वांना कळली.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.