AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांतसिंग सारखं मला मारण्याचा प्रयत्न, यात नाना पाटेकरांचा हात; तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. तिला होणाऱ्या मानसिक छळाबद्दल तिने या व्हिडीओमध्ये सांगितले होते. पण आता तिने नाना पाटेकरांचं नाव घेत तिला देण्यात येणाऱ्या त्रालाला नाना पाटेकर जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे.

सुशांतसिंग सारखं मला मारण्याचा प्रयत्न, यात नाना पाटेकरांचा हात; तनुश्री दत्ताचे गंभीर आरोप
Tanushree Dutta Accuses Nana Patekar of Harassment Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 23, 2025 | 3:00 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात तिने तिच्यासोबत घडत असलेल्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगत आहेत की, गेल्या 4-5 वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. तसेच घरात मानसिक त्रासाला तसेच शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. तसेच तिला मदतीची गरज आहे असे देखील तिने म्हटले आहे. तिने म्हटलं की ,”मी खूप काळापासून त्रस्त आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून हे सगळं सहन करत आहे. माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मी आजारी आहे, मी काही कामही करू शकत नाही.” मात्र, या संपूर्ण व्हिडीओमध्ये तनुश्रीने कोणाचेही नाव घेतलेलं नव्हतं. पण टिव्ही 9 मराठीशी बोलताना तनुश्रीने स्पष्ट नाव घेऊन आरोप केले आहेत.

मला हा त्रास देण्यात नाना पाटेकरांचा हात आहे

तिला होत असलेला हा त्रास आणि मानसिक छळ याला नाना पाटेकर जबाबदार असल्याचं तिने स्पष्टपणे म्हटलं आहे. ती म्हणाली “माझ्यासोबत या 4 ते 5 वर्षांपासून फार काही विचित्र घटना घडत आहेत. एकदा उज्जैनमध्ये माझ्या कारचा ब्रेक काढून टाकला होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा पाठलाग केला गेला जात आहे . मी जिथेही जायचे तिथे माझा पाठलाग करणारे लोक मला दिसायचे.माझा फोन देखील हॅक करण्यात आला होता. 2020 मध्ये मी खूप सारे प्रोजेक्ट साईन केले होते पण एक एक करून हे सगळे प्रोजेक्ट माझ्याकडून काढून घेण्यात आले. मला हा त्रास देण्यात नाना पाटेकरांचा हात आहे.” असं तिने गंभीर आरोप केला आहे.

सुशांतसिंग राजपूतसोबत जे केलं तेच माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न

पुढे ती म्हणाली, “सुशांतसिंग राजपूतसोबत जे केलं तेच माझ्यासोबत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एवढंच नाही तर माझ्या जेवणात अनेकदा ड्रग्ज, विष मिसळून मला मारण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करण्यामध्ये नाना पाटेकरांचा हात आहे. कारण त्यांच्यावर मी केस केली होती तेव्हा पासून या सर्व गोष्टी सुरु आहेत. एका मुलाखतीत नानाने स्वत:हून सांगितलं होतं की ते अभिनेते नसते तर ते अंडरवर्ल्ड डॉन असते.”

नानापाटेकरांसोबत बॉलिवूड माफिया मिळालेले आहेत

पुढे तिने नानापाटेकरांसोबत बॉलिवूड माफिया मिळालेले आहेत म्हणत आरोप केले. ती म्हणाली “माझा पाठलाग करण्यासाठी जी माणसं लावली आहेत त्यात नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील नाना पाटेकरांचे कोणी साथी असतील तर त्यांचाही सहभाग आहे. मला त्याच्यावरच हा संशय आहे. माझ्या घरात जी मेड होती ती पण त्यांच्याच ग्रुपमधील असेल कारण ती माझ्या जेवणात काहीतरी मिसळायची ज्यामुळे माझी तब्येत अजून खराब होत होती. मी 17 18 तास बेशुद्ध असल्यासारखं असायचे घरी पण आता हे शोधणे पोलिसांचं काम आहे. मी शांत होते पण जेव्हा मला हे सहन झालं नाही तेव्हा मी पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली आहे”

असं म्हणत तनुश्री दत्ताने अनेक गंभीर आरोप नाना पाटेकरांवर केले आहेत. याचा पोलिस याचा तपास कसा करणार ते पाहणं म्हत्वाचं आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.