Video: अभिनेत्री तनुश्री दत्ताचा पुन्हा खळबळजनक आरोप, घरातल्यांनीच…; रडत शेअर केला व्हिडीओ
अभिनेत्री तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर रडत व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती, 'माझा गेल्या ५ वर्षांपासून घरात छळ होत आहे' असे कोणाचेही नाव न घेता बोलताना दिसत आहे.

भारतात #MeToo चळवळीची सुरुवात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नुकताच इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगत आहेत की, गेल्या 4-5 वर्षांपासून तिचा स्वतःच्या घरात छळ होत आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. तसेच घरात मानसिक त्रासाला तसेच शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. तसेच तिला मदतीची गरज आहे असे देखील तिने म्हटले आहे.
तनुश्री तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. ती म्हणाली, “मी गेल्या 4-5 वर्षांपासून माझ्या घरातच छळाला सामोरी जात आहे. त्रासून मी पोलिसांना फोन केला आणि पोलीस आले. पोलिसांनी सांगितले की, तुम्ही पोलीस ठाण्यात येऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती द्या आणि तुमची तक्रार नोंदवा. मी खूप काळापासून त्रस्त आहे आणि गेल्या पाच वर्षांपासून हे सगळं सहन करत आहे. माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. मी आजारी आहे, मी काही कामही करू शकत नाही.” मात्र, या संपूर्ण व्हिडीओमध्ये तनुश्रीने कोणाचेही नाव घेतलेले नाही. ती नेमकं कोणाविषयी बोलत आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
वाचा: एकाच कोचमध्ये 56 तरुणी… एकीकडेही नव्हतं तिकीट, त्यांच्यासोबत काय घडलं?
View this post on Instagram
तनुश्री दत्ता कोण आहेत?
तनुश्री दत्ताचा जन्म 19 मार्च 1984 रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथे एका बंगाली हिंदू कुटुंबात झाला. त्यांनी 2004 मध्ये फेमिना मिस इंडिया युनिव्हर्सचा किताब जिंकला आणि मिस युनिव्हर्स 2004 मध्ये टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं. ती 2005-2010 आणि 2013 या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होती. 2013 मध्ये एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिला एक विचित्र नृत्य करण्यास भाग पाडलं गेलं होतं, जे तिच्या कराराचा भाग नव्हतं.
नाना पाटेकर यांच्यावरही केले होते आरोप
तनुश्री दत्ताने यापूर्वी नाना पाटेकर आणि कोरियोग्राफर गणेश आचार्य यांच्यावर आरोप केले होते. तिने आरोप केला होता की, ‘हॉर्न ओके प्लीज’ (2008) चित्रपटात एक विचित्र नृत्य करण्यास तिला भाग पाडलं गेलं. TOI नुसार, तनुश्रीने सांगितलं होतं की, नाना पाटेकर यांच्या वर्तनामुळे ती सेटवर अस्वस्थ वाटत होते.
या चित्रपटांमध्ये केलं आहे अभिनय
तनुश्री दत्ता यांनी आशिक बनाया आपने, चॉकलेट: डीप डार्क सीक्रेट्स, 36 चायना टाउन, भागम भाग, रिस्क, रकीब, ढोल, गुड बॉय बॅड बॉय, सास बहू और सेन्सेक्स, अपार्टमेंट यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
