BIGG BOSS 19 मध्ये तब्बल एवढ्या साड्या घेऊन आली तान्या मित्तल, दिवसातून तीनदा बदलते साडी

'बिग बॉस 19' ची स्पर्धक तान्या मित्तलची बरीच चर्चा होताना दिसत आहे.  तिच्या लक्झरी लाईफबद्दल अनेक गोष्टी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहेत.त्यातील एक गोष्ट म्हणजे तिच्या साड्यांबद्दल. बिग बॉसमध्ये तान्याने किती साड्या आणल्या आहेत हे जाणून धक्का बसेल.  

BIGG BOSS 19 मध्ये तब्बल एवढ्या साड्या घेऊन आली तान्या मित्तल, दिवसातून तीनदा बदलते साडी
Tanya Mittal brings 800 sarees to Bigg Boss 19
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2025 | 9:45 PM

‘बिग बॉस 19’ ची सध्या चर्चा सुरु आहे. हळूहळू शोमधील स्पर्धकांमध्ये स्पर्धा दिसू लागली आहे. तसेच प्रत्येकाचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. पण बिग बॉसच्या घरात आलेल्या प्रत्येक स्पर्धकाची काहीतरी खासियत आहे. या स्पर्धकांमधील एक म्हणजे तान्या मित्तल. जी सध्या चर्चेचा विषय बनताना दिसत आहे. तेही तिच्या तिच्या आलिशान जीवनशैलीमुळे. पहिल्या भागात तान्या तिच्या बॉडीगार्ड्सबद्दल बोलताना दिसली होती. तेव्हाही घरातील इतर सदस्यांना फार आश्चर्य वाटले होते.

‘बिग बॉस’च्या घरात 800 हून अधिक साड्या आणल्या आहेत 

तसेच ती अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होताना दिसत आहे ते म्हणजे तिच्या साड्या. घरातली ती रोज वेगवेगळ्या स्टाईलच्या साड्या नेसताना दिसते. एवढंच नाही तर ती भरपूर संख्येमध्ये साड्या घेऊन शोमध्ये आली आहे. तान्याने ‘बिग बॉस’च्या घरात 800 हून अधिक साड्या आणल्या आहेत.

लक्झरी लाईफ कुठेही सोडू शकत नाही.

ती म्हणते की ती तिची लक्झरी लाईफ कुठेही सोडू शकत नाही. तान्याने एका मुलाखतीत म्हटले होते की , ‘ मी माझी लक्झरी सोडत नाहीये. मी माझे दागिने, अॅक्सेसरीज आणि 800 हून अधिक साड्या घेऊन बिग बॉसच्या घरात जाणार आहे. मी दररोज 3 साड्या घालणार आहे, ज्या मी दिवसभर बदलत राहीन. ‘
त्यामुळे तान्या तिच्या लक्झरी लाईफमुळे तर चर्चेत आहे पण सोबतच आता ती तिच्या साड्यांमुळेही चर्चेत आली आहे.

कुंभमेळ्यात 100 जणांना वाचवलं 

सोशल मीडियावर तान्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सोशल मीडिया वापरकर्ते त्या व्हिडिओंवर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. शोच्या पहिल्या दिवशी तान्या म्हणाली होती की , ‘ माझ्या अंगरक्षकांनी कुंभमेळ्यात 100 लोकांना वाचवले, पोलिसांनाही. मी याच कारणासाठी इथे आले आहे.’ पण त्यावरूनही तिला आता ट्रोल केलं जात आहे.


घरातील प्रत्येकासोबत बॉडिगार्ड का असतो?

माझे अंगरक्षक चांगले प्रशिक्षित आहेत. मला आतापर्यंत कोणत्याही धमक्या मिळालेल्या नाहीत पण मी सुरक्षारक्षक नेमण्यासाठी मला येणाऱ्या धमक्यांची वाट पाहत आहे. जेव्हा तान्याला विचारण्यात आले की जर तिला कोणताही धोका नाही तरही ती अंगरक्षक का ठेवते. यावर तिने सांगितले की हे सर्व माझ्या कुटुंबात आधीपासूनच आहे. तिच्या घरातील प्रत्येकासोबत बॉडिगार्ड असतोच.

सोशल मीडियावर तान्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सर्च

तिने याबद्दल सांगताना म्हटलं,”आम्हाला सुरक्षेसोबत फिरण्याची सवय आहे. आमच्याकडे पीसीओ आणि कर्मचारी इत्यादी आहेत.” तान्याकडून या गोष्टी ऐकल्यानंतर, लोक आता सोशल मीडियावर तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल बरंच सर्च करताना दिसत आहेत. वृत्तानुसार, तान्याचे वडील एक व्यावसायिक आहेत. ती ग्वाल्हेरची आहे. तान्याचे इंस्टाग्रामवर 2.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.