‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या बालकलाकाराला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल!

‘गोगी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता समय शाहला (Actor Samay Shah) एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या बालकलाकाराला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल!

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत ‘गोगी’ अर्थात गुरुचरणसिंह सोढीची (Gogi) भूमिका साकारणाऱ्या अभिनेता समय शाहला (Actor Samay Shah) एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहीत समयने या संदर्भात माहिती दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या सोसायटीमध्ये शिरून त्याला शिवीगाळ केली. यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन सदर व्यक्ती तिथून पसार झाला आहे. याबाबत समय शाहने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Tarak Mehta ka Ooltah Chashmah  Gogi fame actor Samay shah get death threats)

समय शाहने आपल्या इंस्टा स्टोरीवर या घटनेविषयी सविस्तर सांगितले आहे. त्याच्या या पोस्टनुसार, 27 ऑक्टोबरला त्याच्या मुंबईच्या घरी येऊन काही लोकांनी त्याला धमकावले होते. सीसीटीव्ही फुटेजमधला एक फोटो पोस्ट करत, याबद्दल लिहिताना त्याने म्हटले की, ‘हा माणूस दोन दिवसांपूर्वी माझ्या सोसायटीत आला होता. अचानक त्याने मला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मला ठार मारण्याची धमकीही दिली.’

‘मी ही माहिती पोस्ट करत आहे, जेणेकरून माझ्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना या गोष्टीची आगाऊ माहिती असावी’, असे त्याने म्हटले आहे. त्याने सोशल मीडियावरील स्टोरीमध्ये शेअर केलेल्या चित्रात एक व्यक्ती दिसली आहे. हा फोटो समय राहत असलेल्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमधून घेतल्याचे कळते आहे.(Tarak Mehta ka Ooltah Chashmah  Gogi fame actor Samay shah get death threats)

धमकीची तिसरी वेळ

आश्चर्याची गोष्ट म्हणजे समयला अशी धमकी मिळण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही 3 वेळा त्याला अशाच प्रकारची धमकी देण्यात आली होती. सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने केवळ त्याचे कुटुंबीयच नाही तर, त्याचे चाहतेही देखील हैराण झाले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, परंतु अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यावेळी सोशल मीडियावर शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली. फुटेजमध्ये त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे, अशा परिस्थितीत पोलिस लवकरच आरोपीला अटक करतील अशी सर्वांना आशा आहे.(Tarak Mehta ka Ooltah Chashmah  Gogi fame actor Samay shah get death threats)

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे 3000 भाग पूर्ण

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेने नुकताच 3000 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोरोनामुळे जंगी सेलिब्रेशन करता आले नसले तर, एका लहानशा सोहळ्याचे आयोजन सेटवर करण्यात आले होते. मालिकेच्या पहिल्या भागापासून लोकांची पसंती मिळाल्याने इथवर पोहोचल्याचे निर्माते आसितकुमार मोदी म्हणतात. या मालिकेती सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

(Tarak Mehta ka Ooltah Chashmah  Gogi fame actor Samay shah get death threats)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *