
मुंबई : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) हे गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या रिलेशनशिपमुळे प्रचंड चर्चेत आहेत. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची पहिली भेट ही बिग बाॅस 15 च्या घरात झाली आणि तिथूनच त्यांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. अनेकांनी सुरूवातीला म्हटले की, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे बिग बाॅसच्या घरात राहण्यासाठी प्रेमाचा नाटक करत आहेत. तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 (Bigg Boss 15) ची विजेती देखील आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यातील प्रेम बिग बाॅसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही बघायला मिळत आहे. अनेक पार्ट्यांमध्येही तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा हे एकसोबत सहभागी होतात.
तेजस्वी प्रकाश हिच्या वाढदिवसाचे स्पेशल आयोजन करण कुंद्रा याने केले होते. इतकेच नाही तर यांचे काही गाणे देखील रिलीज झाली आहेत. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. विशेष म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या रिलेशनशिपवर दोघांचेही कुटुंबिय खुश असल्याचे बघायला मिळते.
तेजस्वी प्रकाश ही सध्या नागिन 6 मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे तर दुसरीकडे मोठी मालिका करण कुंद्रा यालाही मिळाली आहे. करण हा देखील मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच तेजस्वी प्रकाश हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये तेजस्वी प्रकाश ही तिच्या आणि करण कुंद्राच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे.
तेजस्वी प्रकाश ही म्हणाली की, मला माझ्या रिलेशनशिपमध्ये अजिबात दबाव नाहीये. मला माझ्या आणि करणच्या लग्नाबद्दल सातत्याने विचारले जाते. करण याला माहिती आहे की, मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये एका चांगल्या ठिकाणी आहे. तो मला लग्नाबद्दल तेव्हाच बोलेल ज्यावेळी मी त्याच्यासाठी तयार असेल.
सर्वात महत्वाचे म्हणजे आम्ही दोघेही आमच्या नात्यामध्ये सुरक्षित आहोत. त्यामुळेच कोणत्याही दबावची अजिबातच नक्कीच गरज नाहीये. काही दिवसांपूर्वीच सर्वत्र पसरले होते की, करण आणि तेजस्वीने घर खरेदी केले आहे. मात्र, कदाचित ते लोक मला ओळख नसतील मी कोण आहे आणि मी किती दिवसांपासून टीव्ही क्षेत्रामध्ये काम करत आहे.