“हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच..”; 11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना आदेश बांदेकरांचं सडेतोड उत्तर

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Apr 19, 2022 | 11:49 AM

नुकतंच 'होम मिनिस्टर'चं नवीन पर्व 'महामिनिस्टर' हे प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून या पर्वाच्या विजेतीला 11 लाख रुपयांची पैठणी (Paithani) मिळणार आहे. सोन्याची जर आणि हिरेजडीत या पैठणीची चर्चा सगळीकडे सुरु असताना काहींनी त्याला ट्रोलदेखील केलं.

हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच..; 11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना आदेश बांदेकरांचं सडेतोड उत्तर
Aadesh Bandekar
Image Credit source: Instagram

झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ (Home Minister) हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या 18 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतभरातील वहिनींचा सन्मान करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्याचं काम या कार्यक्रमाद्वारे सूत्रसंचालक आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी केलं आहे. नुकतंच ‘होम मिनिस्टर’चं नवीन पर्व ‘महामिनिस्टर’ हे प्रेक्षकांच्या भेटीस आलं असून या पर्वाच्या विजेतीला 11 लाख रुपयांची पैठणी (Paithani) मिळणार आहे. सोन्याची जर आणि हिरेजडीत या पैठणीची चर्चा सगळीकडे सुरु असताना काहींनी त्याला ट्रोलदेखील केलं. 11 लाखांच्या पैठणीवरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ’11 लाखांची पैठणी नेसून कोणाला मिरवायचं आहे, त्यापेक्षा जिथे गरज आहे तिथे ते पैसे वापरा. लोकांना सध्या पैशांची गरज आहे. अनेक गावांत पिण्यासाठी पाणीसुद्धा नाही. उन्हाळ्यामुळे लोकांचे हाल होतायत. तुम्ही त्यांची मदत करा’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी सुनावलं होतं. आता या ट्रोलिंगवर आदेश बांदेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“जे लोक 11 लाख रुपयांच्या पैठणीवरून मला किंवा वाहिनीला ट्रोल करत आहेत, त्यांना कदाचित माहित नाही की ती मी देणार नाहीये. ती पैठणी प्रायोजकांकडून येते. झी मराठी या वाहिनीने होम मिनिस्टर या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे आणि मी या कार्यक्रमाचा निवेदक आहे. हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच त्या ट्रोलिंगकडे गांभीर्याने बघण्याचा विषय संपतो. तसंच 18 वर्षे सतत हा कार्यक्रम सुरु आहे म्हणजेच दररोज 1 पैठणीच्या हिशोबाने जवळपास साडेपाच हजारांपेक्षा जास्त पैठण्या या कार्यक्रमातून वहिनींना मिळाल्या आणि त्यामागे जो विचार आहे तो काहींना कळत नाही. त्यामुळे हे ट्रोलिंग होतंय. 11 लाखांची पैठणी ही येवलामध्ये बनतेय आणि ही पैठणी बनवणारे कारागीर जे आहेत ते मूकबधिर आहेत. त्यामुळे पैठणीची किंमत 11 लाख रुपये असली तरी या कारागिरांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतोय. हा चांगला उद्देश अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नसेल त्यामुळे हे ट्रोलिंग होतंय. पैठणीपेक्षा या कारागिरांचा आणि वहिनींचा आनंद हा लाखमोलाचा आहे”, असं उत्तर बांदेकरांनी ट्रोलर्सना दिलं.

पहा पैठणी-

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

महामिनिस्टर या नव्या पर्वात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पैठणीचा खेळ खेळला जाणार आहे. विजेत्या वहिनींना महामिनिस्टरचा किताब आणि 11 लाख रुपयांची सोन्याची जरी असलेली हिरेजडीत पैठणी मिळणार आहे.

हेही वाचा:

KGF: रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या KGF च्या खऱ्या खाणीची कहाणी; जिथून निघालं होतं तब्बल 900 टन सोनं

Sanjay Dutt: हिंदी चित्रपटांचं कुठे चुकतंय? RRR, KGF2च्या यशानंतर संजय दत्तने सांगितलं कारण

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI