Aai Kuthe Kay Karte | ‘घटस्फोटानंतर अरुंधती काकू इथे राहू शकते तर, माझे बाबा का नाही?’, निखिलच्या प्रश्नांना उत्तरं देताना संजनाला फुटणार घाम!

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच वयोगटातील लोकांचे भावविश्व, आणि नात्यातील गुंतागुंत यांचे सुरेख चित्रण दाखवले जात आहे.

Aai Kuthe Kay Karte | ‘घटस्फोटानंतर अरुंधती काकू इथे राहू शकते तर, माझे बाबा का नाही?’, निखिलच्या प्रश्नांना उत्तरं देताना संजनाला फुटणार घाम!
आई कुठे काय करते

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच वयोगटातील लोकांचे भावविश्व, आणि नात्यातील गुंतागुंत यांचे सुरेख चित्रण दाखवले जात आहे. यात आता संजनाच्या लहान मुलाला अर्थात निखिलला पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं शोधताना संजना आणि इतरांची होणारी दमछाक दिसत आहे.

मालिकेच्या कथानकाने सध्या अतिशय रंजक वळण घेतलं आहे. संजनाने साम-दाम-दंड-भेद वापरून अनिरुद्धशी लग्न करून देशमुखांच्या घरात संसार थाटला आहे. यानंतर आता देशमुखांच्या कुटुंबाची सूत्र एकहाती घेण्यासाठी संजनाची धडपड सुरु आहे. मात्र, या सगळ्यात तिला आपल्या लेकाचा अर्थात निखिलचा विसर पडला आहे. आता निखिल देखील आपल्या आईला भेटायला ‘समृद्धी’मध्ये येणार आहे. मात्र, त्याच्या येण्याने आता नात्यांचा गुंता वाढणार आहे.

छोट्या निखिलला पडले अनेक प्रश्न

संजना आणि शेखर यांचा मुलगा निखिल आईला भेटायला देशमुखांच्या घरात आला आहे. याचवेळी घरात गोकुळाष्टमी निमित्ताने ‘कृष्ण जन्म’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या पूजेला संजना आणि अनिरुद्ध जोडीने बसले होते. यावेळी, तिथे उपस्थित असलेल्या लहानग्या निखिलला प्रश्न पडला होता की, अनिरुद्ध काकांबरोबर आपली आई का पूजेला बसलीय? हा प्रश्न विचारत तो अरुंधतीला अनिरुद्धसोबत पुजेस बसण्यास सांगतो. अर्थात घडल्या प्रकारची त्याला काहीच कल्पना नाहीय.

घटस्फोटानंतर अरुंधती काकू इथे राहू शकते तर, माझे बाबा का नाही?

यानंतर आता लहानग्या निखिलला आणखी अनेक प्रश्न पडले आहेत, त्यातील एक म्हणजे ‘घटस्फोटानंतर अरुंधती काकू इथे राहू शकते तर, माझे बाबा का नाही?’. निखिलला वाटते आहे की, अरुंधती प्रमाणेच शेखरने देखील त्यांच्यासोबत राहिले पाहिजे आणि आता त्याला असेच आणखी काही प्रश्न पडलेयत आणि पडणार आहेत. यामुळे आता त्याला उत्तरं कशी द्यायची हा मोठा प्रश्न संजना आणि अनिरुद्ध समोर उभा राहणार आहे.

अनिरुद्धची धाव पुन्हा अरुंधतीकडे!

मालिकेत नुकताच कृष्णजन्म सोहळा पार पडला. यावेळी देशमुखांच्या घरी अनघाने देखील हजेरी लावली होती. तर, रात्री उशीर झाली, तिला एकटीला घरी जावे लागू नये म्हणून गौरीने अनघाला रात्री तिच्या घरी थांबण्याची विनंती केली. तर, अनघासोबत आजची रात्र सगळे धमाल करू असं म्हणत, गौरीच्या घरी गप्पा आणि दम शेराजची मैफल रंगली. सगळे तिथे गेलेले पाहून अनिरुद्ध देखील तिथे जाण्याची धडपड करत होता. संजनाचा डोळा चुकवून अनिरुद्ध गुपचूप गौरीच्या घरी गेला. इथे संजना त्याच्य्साठी कॉफी घेऊन बाल्कनीत आली आणि तिला समोर अनिरुद्ध आणि अरुंधती हसत एकमेकांना टाळी देताना दिसले. हे पाहून आता संजनाचा तिळपापड झाला आहे.

हेही वाचा :

Gautami Deshpande: छबिदार सुरत देखणी, जणू हिरकणी, नार गुलजार… गौतमी देशपांडेचा अस्सल मराठमोळा अंदाज पाहाच!

Sapna Choudhary | आधी अपघाती मृत्यूच्या अफवेची जोरदार चर्चा, आता सपना चौधरीच्या नव्या व्हिडीओमुळे चाहते आनंदी! 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI