Sapna Choudhary | आधी अपघाती मृत्यूच्या अफवेची जोरदार चर्चा, आता सपना चौधरीच्या नव्या व्हिडीओमुळे चाहते आनंदी! 

हरियाणवी नृत्यांगना सपना चौधरी (Sapna Choudhary) हे हरियाणातच नव्हे तर मनोरंजन विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. तिची फॅन फॉलोइंग एका मोठ्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. आजही लाखो प्रेक्षक सपनाचे स्टेज शो पाहण्यासाठी एकत्र जमत असतात.

Sapna Choudhary | आधी अपघाती मृत्यूच्या अफवेची जोरदार चर्चा, आता सपना चौधरीच्या नव्या व्हिडीओमुळे चाहते आनंदी! 
Sapna Choudhary

मुंबई : हरियाणवी नृत्यांगना सपना चौधरी (Sapna Choudhary) हे हरियाणातच नव्हे तर मनोरंजन विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. तिची फॅन फॉलोइंग एका मोठ्या सुपरस्टारपेक्षा कमी नाही. आजही लाखो प्रेक्षक सपनाचे स्टेज शो पाहण्यासाठी एकत्र जमत असतात. सपना केवळ तिच्या नृत्यासाठीच नव्हे तर, तिच्या फोटोंमुळेही चर्चांमध्ये राहिली आहे. ती सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते.

सपनाने तिचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्यचा धक्का दिला आहे. नुकतीच सपना चौधरी बद्दल एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली होती. सपना चौधरीबद्दल सोशल मीडियावर अशा अफवा पसरल्या होत्या की, तिचा रस्ते अपघातादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचवेळी, या बातमीनंतर लोकांनी तिला श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली होती. तथापि, ही केवळ एक अफवा होती आणि ती तिच्या कुटुंबासह पूर्णपणे ठीक असल्याचे, तिच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, आता सपनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पाहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary)

सपना चौधरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक लेटेस्ट व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती आरशासमोर बसून स्वतःच्या मोबाईलवर व्हिडीओ बनवताना दिसत आहे. त्याच वेळी, आपण पाहू शकतो की या वेळी तिचा मेकअप आर्टिस्ट तिच्या मागे केशरचना करताना दिसतो. त्याचबरोबर, व्हिडीओमधील सपनाची स्टाईल पाहण्यासारखी आहे. व्हिडीओमध्ये दिसते सपना ‘मोटी मोटी अंख… मेरी करती शरारत….’वर रील तयार करत आहे. चाहत्यांना तचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. त्याच वेळी, हजारो चाहत्यांनी तिचा हा व्हिडीओ आतापर्यंत पाहिला आहे.

सपना नावाच्या आणखी एका कलाकाराचे झाले निधन

सपना चौधरीच्या मृत्यूची बातमी अफवा ठरली. मात्र, वास्तविक सपना नावाच्या आणखी एका अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. पण ज्यांनी ही बातमी व्हायरल केली, त्यांनी त्या सपनाला सपना चौधरी असे लिहून सोशल मीडियावर ती चालवले. हरियाणामध्येच नाही, तर संपूर्ण भारतात सपना चौधरीचे चाहते आहेत. बिग बॉसमध्येही तिने आपले नशीब आजमावले. आज सपना सोशल मीडियावर 3.4 दशलक्ष चाहत्यांची लाडकी आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून सर्वांचे मनोरंजन करते. देश-विदेशातील लोक तिचे व्हिडीओ पाहतात. तिच्या व्हिडीओंच्या खाली लिहिलेल्या टिप्पण्या या गोष्टीचा पुरावा आहेत.

सध्या काय करतेय अभिनेत्री?

सपना चौधरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आजकाल ‘& टीव्ही’चा क्राईम शो ‘मौका-ए-वारदत’मध्ये रवी किशन आणि मनोज तिवारी यांच्यासह शो होस्ट करताना दिसत आहे. याशिवाय सपनाने हरियाणवी इंडस्ट्री, भोजपुरी, पंजाबी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. तिने ‘दोस्ती के साईड इफेक्ट्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सपना चौधरी ‘बिग बॉस 11’ चा भाग राहिली आहे.

हेही वाचा :

‘रात्रीस खेळ चाले 3’च्या गणपती स्पेशल भागाचे हटके पद्धतीने चित्रीकरण, प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार कोकणी संस्कृती!   

Video | नाकात नथ, गळ्यात ठुशी, नऊवारी साडी! मराठमोळा साज लेऊन राजेश्वरी खरातची गणपती बाप्पाला नृत्यवंदना! पाहा व्हिडीओ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI