AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay karte | अरुंधतीला पहिला पगार मिळणार, तर संजनाची नोकरी जाणार! पाहा ‘आई कुठे काय करते’मध्ये पुढे काय घडणार…

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच वयोगटातील लोकांचे भावविश्व, आणि नात्यातील गुंतागुंत यांचे सुरेख चित्रण दाखवले जात आहे.

Aai Kuthe Kay karte | अरुंधतीला पहिला पगार मिळणार, तर संजनाची नोकरी जाणार! पाहा ‘आई कुठे काय करते’मध्ये पुढे काय घडणार...
Aai Kuthe kay karte
| Edited By: | Updated on: Sep 13, 2021 | 4:17 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. मालिकेत सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच वयोगटातील लोकांचे भावविश्व, आणि नात्यातील गुंतागुंत यांचे सुरेख चित्रण दाखवले जात आहे. यात आता संजनाच्या लहान मुलाला अर्थात निखिलला पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं शोधताना संजना आणि इतरांची होणारी दमछाक दिसत आहे. तर, दुसरीकडे अनिरुद्धप्रमाणेच संजनावर देखील बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

मालिकेच्या कथानकाने सध्या अतिशय रंजक वळण घेतलं आहे. संजनाने साम-दाम-दंड-भेद वापरून अनिरुद्धशी लग्न करून देशमुखांच्या घरात संसार थाटला आहे. यानंतर आता देशमुखांच्या कुटुंबाची सूत्र एकहाती घेण्यासाठी संजनाची धडपड सुरु आहे. मात्र, या सगळ्यात तिच्या नोकरीकडे तिचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे आता तिला देखील बेरोजगारीचा फटका सोसावा लागणार आहे.

अरुंधतीला मिळणार पहिला पगार!

यशच्या एका मित्राच्या शॉर्ट फिल्मसाठी अरुंधतीला गाणं गाण्याची संधी मिळणार आहे. केवळ संधीच नाही तर यामुळे अरुंधतीच्या हातात तिचा पहिला-वाहिला पगार देखील येणार आहे. या गाण्यातून मिळालेले मानधन अर्थात पहिला पगार अरुंधती अप्पा आणि आईच्या हातात देणार आहे. गाण्याच्या संधी व्यतिरिक्त अरुंधतीला एक नवी नोकरी देखील मिळाली आहे.

संजना होणार बेरोजगार

अरुंधतीचा पहिला पगार आणि त्याच्या सेलिब्रेशनचा माहोल असतानाच, आता संजनाची नोकरी मात्र गेल्यात जमा होणार आहे. घरात पार्टीची चर्चा सुरु असतानाच संजना कामावरून घरी परतते. इतक्यात अनिरुद्ध तिला तुझं प्रेझेन्टेशन नक्कीच चांगलं झालं असणार असं म्हणतो. तेव्हा चेहरा पाडून संजना त्याला आपली नोकरी धोक्यात असल्याचे सांगते. माझ्या लॅपटॉपमधून प्रेझेन्टेशन डिलीट झाल्याने मेहताने मला देखील दोन महिने घरी बसण्यास सांगितले आहे, असे संजना म्हणते. तर, सकाळी निखिल अभ्यास करत असताना तूच माझ्या लॅपटॉपमध्ये काहीतरी केलं होतंस, अर्थात अरुंधतीनेच ते प्रेझेन्टेशन डिलीट केल्याचा आरोप संजना करणार आहे.

पाहा नवा प्रोमो :

छोट्या निखिलला पडले अनेक प्रश्न

संजना आणि शेखर यांचा मुलगा निखिल आईला भेटायला देशमुखांच्या घरात आला आहे. याचवेळी घरात गोकुळाष्टमी निमित्ताने ‘कृष्ण जन्म’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या पूजेला संजना आणि अनिरुद्ध जोडीने बसले होते. यावेळी, तिथे उपस्थित असलेल्या लहानग्या निखिलला प्रश्न पडला होता की, अनिरुद्ध काकांबरोबर आपली आई का पूजेला बसलीय? हा प्रश्न विचारत तो अरुंधतीला अनिरुद्धसोबत पुजेस बसण्यास सांगतो. अर्थात घडल्या प्रकारची त्याला काहीच कल्पना नाहीय.

घटस्फोटानंतर अरुंधती काकू इथे राहू शकते तर, माझे बाबा का नाही?

यानंतर आता लहानग्या निखिलला आणखी अनेक प्रश्न पडले आहेत, त्यातील एक म्हणजे ‘घटस्फोटानंतर अरुंधती काकू इथे राहू शकते तर, माझे बाबा का नाही?’. निखिलला वाटते आहे की, अरुंधती प्रमाणेच शेखरने देखील त्यांच्यासोबत राहिले पाहिजे आणि आता त्याला असेच आणखी काही प्रश्न पडलेयत आणि पडणार आहेत. यामुळे आता त्याला उत्तरं कशी द्यायची हा मोठा प्रश्न संजना आणि अनिरुद्ध समोर उभा राहणार आहे.

हेही वाचा :

‘लाल सिंह चड्ढा’च्या चित्रीकरणाला मुंबईत सुरुवात, दाढी-पगडीमध्ये स्पॉट झाला आमिर खान! पाहा खास लूक…

रणवीर सिंह-दीपिका पदुकोणची अलिबागमध्ये महागडी शॉपिंग! खरेदी केली तब्बल 90 गुंठे जागा!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.