AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई कुठे काय करते’ मालिकेची वेळ बदलली, आता…; मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत

Milind Gawali Post About Aai Kuthe Kay Karte Serial : अभिनेते मिलिंद गवळी यांनी आई कुठे काय करते मालिकेबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मालिकेच्या बददलेल्या वेळेवर आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादावर भाष्य केलं आहे. मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये काय म्हटलंय? वाचा सविस्तर

'आई कुठे काय करते' मालिकेची वेळ बदलली, आता...; मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
| Updated on: Apr 04, 2024 | 8:00 AM
Share

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ ही आता वेगळ्या वळणावर आली आहे. आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीचा नवा प्रवास सुरु झाला आहे. याचबरोबर मालिकेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. 18 मार्चपासून सोम ते शनि दुपारी 2:30 वाजता या नव्या वेळेत ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेची बदललेली वेळ आणि प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद याबाबत अनिरुद्ध भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. मालिकेची वेळ बदलल्यानंतर प्रेक्षक बघतील का अशी एक शंका होती पण अनेक प्रेक्षक भेटतात जे दुपारी आमची मालिका बघतात, असं मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टमध्य म्हटलंय.

मिलिंद गवळी यांची पोस्ट जशीच्या तशी

“आई कुठे काय करते” आता सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता. जवळजवळ सव्वाचार वर्ष आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता यायची. ही मालिका इतकी लोकप्रिय होती की संध्याकाळी साडेसात वाजता असंख्य घरांमध्ये स्टार प्रवाह चॅनल लागलेला असायचं, या चार वर्षात मी असंख्य लोकांना भेटलो असंख्य कुटुंबांना भेटलो सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की आमच्याकडे “आई कुठे काय करते” ही मालिका आवर्जून बघितली जाते, त्यावेळेला कुणीही दुसरं चॅनल लावत नाही , आयपीएल असलं तरी सुद्धा साडेसात वाजता “आई कुठे काय करते “ ही मालिका बघितली जायची, आता 18 मार्चपासून चा निर्णय घेण्यात आला की आमची ही मालिका संध्याकाळी साडेसात च्या ऐवजी दुपारी अडीच वाजता दाखवण्यात येईल.

संध्याकाळची बघितली जाणारी मालिका दुपारी बघितली जाईल का असा एक मनामध्ये प्रश्न येत होता, पण आता दोन आठवडे झाले आणि मी ज्या ज्या लोकांना भेटतोय, त्यातल्या बऱ्याचशा बायका मला सांगतात की “आम्ही आता दुपारी मालिका बघायला सुरुवात केली आहे बर का “ ! मला ऐकून छान वाटलं. आणि माझ्या असं ही ऐकण्यात आलं आहे की दुपारच्या वेळेचा टीआरपी पण अतिशय चांगला आहे .

मला असं वाटतंय ज्यांना ज्यांना ही मालिका आवडते आणि जे आवर्जून ही मालिका बघतात, त्यांच्यासाठी वेळेचं काही बंधन नाहीये, संध्याकाळी असो दुपारी असो किंवा मग हॉटस्टार वर असो बघणारे हे आवडीने बघतातच , मला खरंच स्टार प्रवाह चं ,राजनशाहींचं, नमिताचं, सतीश राजवाडे यांचं, दिग्दर्शकांच्या टीम्सचं, creative team चं माझ्या सहकलाकारांचं पूर्ण युनिटचं कौतुक करावसं वाटतं, उत्तम काम करायचीconsistency, creative thinking, persistency, बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की ही मालिका खूप चालली आहे, आता अजून पुढे हे काय दाखवणार आहेत ? पण या मालिकेचा कलाकार म्हणून प्रत्येक वेळेला माझ्या हातात जेव्हा स्क्रिप्ट येते, स्क्रीन प्ले येतो, माझी स्वतःची काम करायची उत्सुकता वाढत जाते.

माणसांच्या आयुष्यावर आधारलेली गोष्ट , ही इतक्या लवकर कशी संपू शकेल , जसं आपल्या सगळ्यांचे आयुष्यामध्ये सतत काही ना काहीतरी घडत असतं, तसंच या देशमुख कुटुंबामध्ये interesting, unpredictable, आपली उत्कंठा आणि उत्सुकता वाढवणारा घडत असतं, आजही मला करताना तेवढीच मजा येते आहे . बरं ईथे बाहेर अतिशय ऊन वाढलेला आहे, 37\38 डिग्री आहे, तुमच्या इथे ऊन वाढलं असेल तर, तुम्ही पण सगळे काळजी घ्या भरपूर पाणी पीत जा, शक्यतो उन्हात जाऊ नका, अडीच वाजता स्टार प्रवाह वर “आई कुठे काय करते” बघा.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.