आपल्याच मेहनतीचा पैसा भीक मागितल्यासारखा मागणं योग्य आहे का?, संग्राम समेळचा संतप्त सवाल…

‘आपलेच हक्काचे पैसे सतत भीक मागितल्यासारखे मागणे योग्य आहे का?’, असा प्रश्न अभिनेता संग्राम समेळ याने सोशल मीडियाद्वारे विचारला आहे.

आपल्याच मेहनतीचा पैसा भीक मागितल्यासारखा मागणं योग्य आहे का?, संग्राम समेळचा संतप्त सवाल...
अभिनेता संग्राम समेळ
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 11:34 AM

मुंबई : कलाकार, तंत्रज्ञ आणि मालिका निर्माते यांचा एक वाद सध्या बराच चर्चेत आला आहे. अनेक कलाकारांनी या बाबतीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता संग्राम समेळ (Sangram Samel) याने देखील सोशल मीडियावर पोस्ट करत आपला राग व्यक्त केला आहे. अनेक वेळा कलाकारांचे मानधन थकवले जात असल्यावरून कलाकारांनी आपला रोष व्यक्त केला आहे. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिने या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केला (Actor Sangram Samel facebook post on Mandar devsthali and media issues).

शर्मिष्ठा राऊत हिने सोशल मीडियावर सर्वात प्रथम पोस्ट करुन हे प्रकरण सर्वांसमोर आणले आहे. शर्मिष्ठा सध्या कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत काम करत होती. ही मालिका सध्या ऑफ एअर गेली आहे. यानंतर अभिनेत्री शर्मिष्ठासह मालिकेतील अनेक कलाकारांनी याबद्दल आपला रोष व्यक्त केला आहे.

शर्मिष्ठा राऊतचा आरोप काय?

मालिका बंद झाल्यानंतर शर्मिष्ठा पतीसह व्हेकेशन ट्रीपवर गेली होती. तिथून परतल्यानंतर, या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे पैसे निर्माते मंदार देवस्थळी यांनी थकवल्याचा दावा शर्मिष्ठा राऊत हिने केला आहे. शर्मिष्ठासोबतच ‘हे मन बावरे’ या मालिकेतील मृणाल दुसानीस, संग्राम समेळ आणि विदिशा म्हसकर या कलाकारांनीही सोशल मीडियावर शेअर करत शर्मिष्ठाला पाठिंबा दिला आहे.

‘हक्काच्या पैशासाठी भीक मागावी का?’ : संग्राम समेळ

आधीच मालिका क्षेत्रात मानधन मिळण्याचा कालावधी हा 90 दिवसांचा असतो. अर्थात जर एखाद्या कलाकाराने 1 जानेवारीला काम केले असेल, तर त्याचे मानधन मिळण्यासाठी त्याला पुढील 3 महिने अर्थात 1 एप्रिलच्या दिवसाची वाट पहावी लागते. त्यातही निर्मात्याने पैसे बुडवण्यास सुरुवात केली असल्याने कलाकाराही चांगलेच संतापले आहेत. ‘आपलेच हक्काचे पैसे सतत भीक मागितल्यासारखे मागणे योग्य आहे का?’, असा प्रश्न अभिनेता संग्राम समेळ याने सोशल मीडियाद्वारे विचारला आहे (Actor Sangram Samel facebook post on Mandar devsthali and media issues).

संग्रामची पोस्ट…

‘नमस्कार ! आम्ही कलाकार नेहमी आपल्याकडुन चांगलं काम व्हावं या हेतूने मेहनत घेत असतो. उत्तम काम आणि ते केल्यावर त्याचा योग्य मोबदला हाच हेतू असतो आणि तो असावा. पण काम करुनही त्याचा पैसा वेळेवरच न मिळणे, योग्य आहे?

अनेक वेळा अस होत कि, आपण खूप प्रामाणिक पणे आपले काम(शुटिंग) करतो.. आपलं प्रोजेक्ट हे आपलं बाळ आहे आणि प्रोडक्शन हाऊस हे आपलं घर अस समजून वेळेची, परिस्थितीशी, घरच्यांशी, प्रोडक्शन हाऊस कडून न मिळणाऱ्या गोष्टींशी, हाऊस च्या Missmanagement शी adjustment करून सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार अविरत काम करत असतात.. चॅनल चा उत्तम सपोर्ट असूनही काही निर्माते कामाचा योग्य तो मोबदला देत नाहीत.. अनेक कारणं वारंवार मिळतं असतात.. आम्ही मात्र निर्माता जगला तर कलाकार जगला ह्या तत्वांतर्गत काम करत असतो.. मग वेळच्या वेळी चॅनलकडून पैसे येवून पण कलाकारांना आणि तंत्रज्ञानांना पैसे निर्मात्याकडून न मिळण हे योग्य आहे का?(Actor Sangram Samel facebook post on Mandar devsthali and media issues)

निर्मात्याच्या अडिअडचणींच्या वेळेस, episodes ची Bank नाही म्हणून किंवा कधी कधी निर्मात्यांकडे costumes नाही म्हणून घरून आपले costumes आणून शूटिंगचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मदत करणे आता चुक आहे का? आपल्याच मेहनतीचा हक्काचा पैसा मोबदला भिक मागीतल्या सारखा सतत मागत रहाणे हे योग्य आहे का?’

अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया

संग्रामच्या या पोस्टवर जेष्ठ अभिनेते अशोक समेळ यांनी, ‘सर्वांनी हे जरूर वाचा. त्याचबरोबर सर्व तंत्रज्ञ आणि कलाकारांनी एकत्र येणे आता खूप गरजेचे आहे’, असे म्हटले आहे. तर, अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील ‘सर्व कलाकार एकत्र येत नाहीत तोपर्यंत हे असच चालू राहणार’, असे म्हणत आपले मत व्यक्त केले आहे.

(Actor Sangram Samel facebook post on Mandar devsthali and media issues)

हेही वाचा :

घाबरु नका, बोला, मंदार देवस्थळींनी पैसे थकवले, मराठी अभिनेत्रीचा गंभीर आरोप

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.