AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking news | अभिनेत्री कल्याणी जाधव हिचा अपघाती मृत्यू

 मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झालाय. 

Breaking news | अभिनेत्री कल्याणी जाधव हिचा अपघाती मृत्यू
| Updated on: Nov 13, 2022 | 12:43 PM
Share

मुंबई : मराठी चित्रपट सिनेसृष्टीतून अत्यंत वाईट बातमी पुढे येतंय. प्रसिध्द टिव्ही अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव हिचा अपघाती मृत्यू झालाय. ही बातमी कळताच सिनेसृष्टीत शोककळा पसरलीये. अत्यंत कमी वेळामध्ये कल्याणीने एक वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने सर्वांनाच मोठा आर्श्चयाचा धक्का बसलाय. सुरूवातीला अनेकांना ही फक्त अफवा असल्याचे देखील वाटले होते. 

मध्यरात्री कोल्हापूर सांगली रस्त्यावरील हालोंडी फाटा इथे डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाल्याचे कळते आहे. तुझ्यात जीव रंगला, जीव माझा गुंतला यासह अन्य मालिकेत कल्याणी जाधवने जबरदस्त भूमिका केल्या आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर कल्याणीने एक वेगळी ओळख निर्माण केली.

काही दिवसांपूर्वीच कल्याणी जाधव हिने हालोंडी फाटा येथे प्रेमाची भाकरी नावाने एक हाॅटेल सुरू केले होते. मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतत असताना डंपरने धडक दिल्याने कल्याणीचा मृत्यू झाला. कोल्हापूर-सांगली मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्येच आता अभिनेत्री कल्याणी हिचाही मृत्यू झाला आहे. 

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.