Video | कोरिओग्राफरच्या चुकीमुळे रुबिना दिलैक गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ

खतरो के खिलाडी शो पूर्ण करून लगेचच रुबिना झलक दिखला जा 10 मध्ये सहभागी झालीये.

Video | कोरिओग्राफरच्या चुकीमुळे रुबिना दिलैक गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ
| Updated on: Oct 23, 2022 | 11:38 AM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) कायमच चर्चेत असते. रुबिनाचे हिंदी भाषेवर जबरदस्त असे प्रभुत्व आहे. रुबिनाला खरी ओळख बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात मिळालीये. रुबिना बिग बाॅसची विजेती देखील आहे. रुबिना आणि तिचा पती अभिनव शुक्ला हे दोघे बिग बाॅसच्या घरात सहभागी झाले होते. बिग बाॅसनंतर काही काळ विश्रांती घेऊन रुबिना खतरो के खिलाडीमध्येही सहभागी झाली होती. यावेळी तिने अनेक स्टंट (Stunt) देखील केले.

खतरो के खिलाडी शो पूर्ण करून लगेचच रुबिना झलक दिखला जा 10 मध्ये सहभागी झालीये. रुबिनाचा डान्स पाहून अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील रुबिनाची मोठी फॅन आहे. झलक दिखला जा 10 साठी रुबिना खूप मेहनत घेताना दिसत आहे. याचे बरेच व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होतात.

इथे पाहा रुबिना दिलैकचा तो व्हिडीओ

मिळत असलेली माहिती ही रुबिना दिलैकच्या चाहत्यांना अस्वस्थ करणारी आहे. डान्स प्रॅक्टिस करताना रुबिनाच्या खांद्याला मोठी दुखापत झालीये. यामुळे पुढील काही दिवस झलक दिखला जा 10 या डान्स रिअॅलिटी शोमध्ये रुबिना डान्स करू शकणार नाहीये. नेमके काय झाले होते, ज्यामुळे रुबिनाला ही दुखापत झालीये. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दुखापत झालेला खांद्याचा फोटो आणि व्हिडीओ रुबिनाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलाय. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, डान्स प्रॅक्टिस सुरू असताना स्टंट करताना सनम जोहरचा धक्का रुबिनाला लागतो आणि ती थेट खाली पडते. हा काही शेकंदाचा व्हिडीओ आहे. मात्र, यातून हे स्पष्ट दिसत आहे की, रुबिनाला किती गंभीर दुखापत झालीये.