AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Passed Away | सतीश कौशिक यांच्यानंतर या निर्मात्याने घेतला अखेरचा श्वास, अभिनेता म्हणाला…

सतीश कौशिक यांचे निधन झाल्याने अभिनय क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली होती. आता यामध्ये अजून एका निर्मात्याचे निधन झाले आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

Passed Away | सतीश कौशिक यांच्यानंतर या निर्मात्याने घेतला अखेरचा श्वास, अभिनेता म्हणाला...
| Updated on: Mar 13, 2023 | 10:46 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेते आणि निर्माता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन 9 मार्च रोजी झाले. सतीश कौशिक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुंबईमध्ये आयोजित केलेल्या होळी पार्टीमध्ये 7 मार्चला धमाल करताना सतीश कौशिक हे दिसले होते. मुंबईतील (Mumbai) पार्टीनंतर ते दिल्ली येथे होळी सेलिब्रेट करण्यासाठी गेले आणि तिथे त्यांचे निधन झाले. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर बाॅलिवूड (Bollywood) विश्वावर मोठा शोककळा पसरली आहे. चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. विकास मालू यांच्या पत्नीने या प्रकरणात काही मोठे आणि गंभीर खुलासे देखील केले आहेत. मात्र, यावर शशी कौशिक यांनीही मोठी माहिती सांगत. या वादामध्ये सतीश कौशिक यांना ओढू नका असे म्हटले आहे.

सतीश कौशिक यांच्यानंतर आता अजून एका निर्मातेचे निधन झाले आहे. सीआयडी या टीव्ही मालिकेचे निर्माते प्रदीप उप्पर यांचे निधन झाले आहे. त्यांनी सिंगापूर येथे शेवटा श्वास घेतला आहे. सीआयडी मालिकेचे एसीपी प्रद्युम्न उर्फ ​​शिवाजी साटम यांनी ही दु:खद बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

शिवाजी साटम यांनी प्रदीप उप्पर यांच्या निधनाची बातमी देत त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे. सीआयडी मालिकेने अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शिवाजी साटम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सीआयडीचे आधारस्तंभ आणि निर्माते प्रदीप उप्पर … नेहमी हसतमुख, प्रामाणिक आणि मनाने खूप उदार… तुझ्या जाण्याने माझ्या आयुष्यातील एक मोठा अद्भुत अध्याय संपला…..

आता शिवाजी साटम यांची ही पोस्ट सोशस मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट करण्यास सुरूवात केल्या आहेत. चाहत्यांनी शिवाजी साटम यांच्या या पोस्टवर कमेंट करत प्रदीप उप्पर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यासोबत सीआयडी मालिकेतील इतरीही कलाकारांनी प्रदीप उप्पर यांच्या आठवणीमध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?