Star Pravah : ‘स्टार प्रवाह’च्या कलाकारांचा जल्लोष, ‘गणशोत्सव 2021’मध्ये पारंपरिक पद्धतीने होणार गणरायाचं स्वागत

संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार म्हटल्यावर गणेशोत्सवाची रंगत तर द्विगुणीत होणार यात काही शंका नाही. अगदी ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे. (Artists of 'Star Pravah' will be celebrating 'Ganeshotsav 2021' in a traditional way)

Star Pravah : 'स्टार प्रवाह'च्या कलाकारांचा जल्लोष, 'गणशोत्सव 2021'मध्ये पारंपरिक पद्धतीने होणार गणरायाचं स्वागत

मुंबई : गणपती बाप्पा (Ganpati Bappa) हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या‘ म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून वाट बघत बसलेले असतो. भक्तिमय वातावरणाने भारावून टाकणारे हे 10 दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने आणि आसमंत दरवळून टाकणाऱ्या पुजाविधीच्या सामग्रीने बाजारपेठा आता मस्त सजल्या  आहेत.

स्टार प्रवाहचा परिवार बाप्पाच्या आगमनासाठी उत्सुक

बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही आम्ही उत्सुक असताना यात स्टार प्रवाहचा परिवार कसा बरं मागे राहिल. लाडक्या गणरायाचं स्वागत स्टार प्रवाहचे कलाकार अगदी जल्लोषात करणार आहेत. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव 2021 या गणपती विशेष कार्यक्रमात बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार आहे.

नक्की बघा तुमच्या आवडत्या कलाकारांचे हे मनमोहक परफॉर्मन्स…

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं पार पडणार अगदी जल्लोषात 

संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार म्हटल्यावर गणेशोत्सवाची रंगत तर द्विगुणीत होणार यात काही शंका नाही. अगदी ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे.

पारंपरिक खेळांची धमाल, सासु-सुनांच्या जोडींचे मंगळागौरीचे खास खेळ

सणासुदीचे दिवस म्हटले तर त्यात आपले पारंपरिक खेळही ओघाने येतातच ना. तर स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या तुमच्या आवडीच्या सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखील खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनानं परिपूर्ण असा गणपती विशेष कार्यक्रम असेल. स्टार प्रवाह परिवाराचा गणपती असल्यामुळे या परिवाराचा अतिशय महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाचं खास निमंत्रण आहे. रविवार 12 सप्टेंबरला संध्याकाळी 7 वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल. तेव्हा पाहायला विसरु नका 12 सप्टेंबरला सायंकाळी 7 वाजता स्टार प्रवाह परिवार गणशोत्सव 2021.

पाहा स्टार प्रवाहच्या कलाकारांची धमाल

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अजय-अतुल यांच्या सुरांनी वातावरणात भरले जाणार प्रेमाचे रंग…

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

संंबधित बातम्या

‘चला हवा येऊ द्या’ फेम ‘या’ अभिनेत्रीची ऐतिहासिक ‘रावरंभा’ चित्रपटात वर्णी, आता मोठ्या पडद्यावर दाखवणार अभिनयाची जादू!

Shruti Marathe : श्रुती मराठेचा हटके ‘बॉर्बी डॉल’ लूक पाहिला का?; फोटो पाहून फॅन्स म्हणाले…

अरुंधती पुन्हा देशमुखांचं घर सोडणार की ‘समृद्धी’तच नांदणार? ‘आई कुठे काय करते’ मालिकेत येणार नवा ट्वीस्ट!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI