‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेने पार केला 1000 भागांचा टप्पा

कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' (Balumama Chya Navan Chang Bhala) ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केलं आणि त्यामुळेच मालिकेने तब्बल १००० भागांचा पल्ला यशस्वीरित्या गाठला.

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेने पार केला 1000 भागांचा टप्पा
Balumama Chya Navan Chang Bhala Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 9:27 AM

कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balumama Chya Navan Chang Bhala) ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी मालिकेवर भरभरून प्रेम केलं आणि त्यामुळेच मालिकेने तब्बल १००० भागांचा पल्ला यशस्वीरित्या गाठला. याचनिमित्ताने मालिकेच्या सेटवर थोड्या वेगळ्या प्रकारे सेलिब्रेशन करण्यात आलं. कांदिवली इथल्या we will we can foundation या NGO च्या 70 मुलांनी सेटला भेट दिली आणि या मुलांसोबत मालिकेच्या टीमने संवाद साधला. आपल्या आवडत्या कलाकाराला समोर बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी (Sumit Pusavale) सुमित पुसावळे (बाळूमामा) आणि संतोष अयाचित यांचं स्वागत केलं.

पहिल्या भागापासून ते आतापर्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर राहणं सोप नाही. यामागे संपूर्ण टीम म्हणजेच मालिकेतील कलाकार, तंत्रज्ञ, मंडळी यांचा मोलाचा वाटा आहे. या खास प्रसंगी भेटीस आलेल्या मुलांनी त्यांच्या मनातील प्रश्न विचारले. तसेच सुमितनेदेखील त्याचा अविस्मरणीय क्षण सांगितला. सुंदरा म्हणजेच बाळूमामांची आई आणि बाळूमामा यांची मालिकेतील शेवटची भेट ज्यामध्ये बाळूमामा सांगतात आता आपली भेट वैकुंठात तो सीन कधीच विसरणार नाही असं त्याने सांगितलं. असे अजून काही किस्से सांगत ही गप्पांची मैफल रंगत गेली.

इन्स्टा पोस्ट-

जेव्हा बाळूमामा या व्यक्तिरेखेसाठी निवडला गेलो हे मला कळालं तेव्हा आईला ही आनंदाची बातमी सांगताना मला अश्रू अनावर झाले असंदेखील त्याने यावेळेस सांगितलं. यावेळी एका चिमुकलिने सुमितला पुष्प देऊन बाळुमामाच्या नावानं चांगभलं असं म्हटलं तेव्हा सगळ्यांनाच कौतुक वाटलं.

हेही वाचा:

Chirag Patil: सेटवरच्या जेवणाविषयी चिरागने लढवली शक्कल; पाच दिवसांत बदलल्या क्रू मेंबर्सच्या सवयी

Ranbir Alia Wedding: हे असं लग्न लावणं चेष्टा नाय, मंडळी! धाडस लागतं.. धाडस

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.