AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 15 | कलाकारांच्या आधी सामान्यांना घरात प्रवेश, ‘बिग बॉस 15’मध्ये येणार मोठा ट्विस्ट

छोट्या पडद्यावरचा शो ‘बिग बॉस’ प्रेक्षकांना खूप आवडतो. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये बिग बॉसचा 14वा सीझन संपला, ज्याची विजेती रुबीना दिलैक ठरली. आता चाहत्यांना या शोच्या 15व्या (Bigg Boss 15) सीझनची प्रतीक्षा आहे आणि त्यादरम्यान, आगामी सीझनबद्दल काही अपडेट देखील समोर आल्या आहेत.

Bigg Boss 15 | कलाकारांच्या आधी सामान्यांना घरात प्रवेश, ‘बिग बॉस 15’मध्ये येणार मोठा ट्विस्ट
बिग बॉस 15 शोचे काउंटडाउन सुरू, स्पर्धकांचे स्वागत करण्यासाठी 'टायगर इज बॅक'
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Jun 19, 2021 | 3:48 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरचा शो ‘बिग बॉस’ प्रेक्षकांना खूप आवडतो. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये बिग बॉसचा 14वा सीझन संपला, ज्याची विजेती रुबीना दिलैक ठरली. आता चाहत्यांना या शोच्या 15व्या (Bigg Boss 15) सीझनची प्रतीक्षा आहे आणि त्यादरम्यान, आगामी सीझनबद्दल काही अपडेट देखील समोर आल्या आहेत. बिग बॉस 15 शोच्या आगामी सीझनची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या वेळी बिग बॉसमध्ये सेलेब्ससह सामान्य लोकही प्रवेश करणार आहेत. आता या हंगामात आणखी एक ट्विस्ट येणार असल्याची चर्चा आहे (Bigg Boss 15 big twist in new season commoners will enter in house first).

अहवालांनुसार, निर्मात्यांची अशी योजना आहे की, ऑडिशनच्या माध्यमातून निवडले जाणारे सामान्य नागरिक अर्थात स्पर्धक यांना आधी घरात पाठवले जाईल. शो सुरू होण्यापूर्वी प्रेक्षक मतदान करतील आणि भव्य प्रीमियरमध्ये जाण्यासाठी 4-5 सामान्य स्पर्धक निवडतील.

बिग बॉस 15 घराचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. ओमंग कुमारची टीम आणि निर्माते घराच्या डिझाईनला अंतिम पुष्टी देतील. आतापर्यंत काही सेलिब्रिटींना या शोमध्ये आमंत्रित केले गेले आहे. माध्यम वृत्तानुसार शोचा प्रीमियर ऑक्टोबर 2021 मध्ये होणार असल्याचे सांगितले जात आहे. याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, असे म्हटले जात आहे की यावेळी निर्मात्यांना एक्स जोड्या मालिकेत आणायच्या आहेत.

6 महिने चालणार नवा सीझन

पूर्वी अशी बातमी आली होती की, या वेळी हा सीझन 6 महिन्यांचा असेल. तसेच, प्रत्येक हंगामाला आणखी मनोरंजक बनण्यासाठी नवीन स्पर्धक घरात प्रवेश करतील.

या सेलेबल्सची नावे समोर आली

रिपोर्ट्सनुसार, या शोमध्ये वरुण सूद, नेहा मर्दा, भूमिका चावला, पार्थ समथान, सुरभी चंदना, दिशा वाकानी, कृष्णा हे कलाकार दिसणार आहेत. यासोबतच आणखी काही सेलेब्सची नावे समोर आली आहेत. तथापि, अद्याप निर्मात्यांकडून आणि या सेलिब्रिटींकडून कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.

बिग बॉस 14च्या अंतिम सोहळ्यामध्ये सलमान खानने जाहीर केले होते की, 15 व्या हंगामात सामान्य लोकदेखील या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकणार आहेत. म्हणजेच या पर्वात सेलिब्रेटींसह सामान्य लोक देखील बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.

(Bigg Boss 15 big twist in new season commoners will enter in house first)

हेही वाचा :

Happy Birthday Ashish Vidyarthi | वास्तवच्या ‘विठ्ठल काण्या’पासून ते बिच्छूच्या ‘देवराज खत्री’पर्यंत, तब्बल 182 चित्रपटांत खलनायक साकारणारे आशिष विद्यार्थी!

Photo : नॉन-फिल्मी स्टाईलमध्ये गौतमनं केलं होतं काजलला प्रपोज, काजल म्हणाली तो बिलकूल फिल्मी नाही…

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच