Bigg Boss 15 | हिंदी ‘बिग बॉस’मध्ये अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री, मांजरेकर सलमानला म्हणतात ‘अभी बोल क्या करेगा तू’

दीड वर्षांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात केलेल्या एन्ट्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राला त्यांची चांगलीच ओळख झाली आहे. आता हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून केलेल्या पदार्पणामुळे बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Bigg Boss 15 | हिंदी बिग बॉसमध्ये अभिजीत बिचुकलेंची एन्ट्री, मांजरेकर सलमानला म्हणतात अभी बोल क्या करेगा तू
Bigg Boss 15
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 7:30 AM

सातारा : ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये हजेरी लावून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे, सातारा जिल्ह्यातील राजकारणासह राज्यभरात नावलौकिक मिळालेले अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) पुन्हा एकदा चर्चेत आहेत. तेही राष्ट्रीय पातळीवर. याचं कारण म्हणजे बिचुकले आता कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये झळकणार आहेत.

अभिजीत बिचुकले यांची ओळख कवी मनाचे नेते तसेच राजकारणी म्हणून आहे. दीड वर्षांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात केलेल्या एन्ट्रीमुळे अवघ्या महाराष्ट्राला त्यांची चांगलीच ओळख झाली आहे. आता हिंदी बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून केलेल्या पदार्पणामुळे बिचुकले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभिजित बिचुकले यांनी साताऱ्यातील सर्वच निवडणुका लढवल्या असल्याने ते चर्चेत आहेत. एवढेच काय तर त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी देखील निवडणूक लढवली होती.

काय आहे प्रोमोमध्ये

खुद्द ‘बिग बॉस 15’च्या ट्विटर हँडलवरुन त्यांची ओळख करुन देताना ‘अजब वाईल्ड कार्ड एन्ट्री’ अशी करुन देण्यात आली आहे. प्रोमोमध्ये ‘बिग बॉस 15’चा होस्ट आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) दिसत आहे. ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी बिचुकलेंची ओळख करुन दिली आहे. ‘आय अॅम अ आर्टिस्ट, आय अॅम अ रायटर, आय अॅम अ पोएट, आय अॅम अ सिंगर, आय अॅम अ कम्पोझिशन मेकर, आय वाँट टू बी अ बिकम’ असं बिचुकले म्हणतात. त्यावर मांजरेकर ‘यू वाँट टू बिकम प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया’ अशी पुस्ती जोडताना प्रोमोमध्ये दिसतात. त्यावर बिचुकलेंच्या होकारानंतर ‘अभी बोल क्या करेगा तू’ असा सवाल मांजरेकर सलमानला विचारतात. त्यावर सलमानही चक्रावून गेलेला दिसतो.

पाहा व्हिडीओ :

 

राष्ट्रपती ते नगरसेवक, सर्व निवडणुकांची उमेदवारी

अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवून झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याची निवडणुकीत त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली नाही. यासाठीच ख्यातकीर्त असलेले बिचुकले सुरुवातील स्थानिक पातळीवर फेमस होतेच. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाल्यामुळे त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली आणि आता ते अधिकच चर्चेचा विषय ठरु लागले. त्यामुळे हिंदी बिग बॉसमध्ये अभिजित बिचुकले नेमकी काय रंगत आणणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या 

भाजप आणि राष्ट्रवादीचं सोडा, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री

Abhijit Bichukale | अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट पुन्हा जप्त, पंढरपूर पोटनिवडणुकीत ‘नोटा’लाही अधिक मतं