Abhijit Bichukale | अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट पुन्हा जप्त, पंढरपूर पोटनिवडणुकीत ‘नोटा’लाही अधिक मतं

अभिजीत बिचुकले यांना 137 मतं मिळाली आहेत. एकूण वीस उमेदवार असलेल्या या पोटनिवडणुकीत बिचुकले 16 व्या क्रमांकावर फेकले गेले (Pandharpur Abhijit Bichukale Deposit)

Abhijit Bichukale | अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट पुन्हा जप्त, पंढरपूर पोटनिवडणुकीत 'नोटा'लाही अधिक मतं
अभिजीत बिचुकले
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 7:38 AM

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात (Pandharpur by poll results) उडी घेतलेले ‘बिग बॉस मराठी’ फेम (Bigg Boss Marathi) अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांचं डिपॉझिट पुन्हा जप्त झालं आहे. पोटनिवडणुकीत त्यांना केवळ 137 मतं पडली आहेत. भाजपच्या समाधान आवताडे (Samadhan Autade) यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला. (Pandharpur by poll Results Bigg Boss Marathi fame Abhijit Bichukale Deposit Confiscated)

निवडणुकीच्या निकालात डिपॉझिट जप्त होण्याची परंपरा अभिजीत बिचुकले यांनी कायम राखली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार अभिजीत बिचुकले यांना 137 मतं मिळाली आहेत. एकूण वीस उमेदवार असलेल्या या पोटनिवडणुकीत बिचुकले 16 व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. बिचुकलेंसह एकूण 10 उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. बिचुकलेंना मतदान झाल्यापैकी 0.06 टक्के मतं मिळाली.

‘नोटा’लाही अधिक मतं

विशेष म्हणजे ‘नोटा’चं बटणही अधिक मतदारांनी दाबलं. कारण 599 जणांनी नकाराधिकाराचा वापर केला आहे. बळीराजा पक्षाचे उमेदवार डॉ. राजाराम भोसले 69 मतांसह तळाला आहेत.भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना 1 लाख 9 हजार 450 मतं मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना 1 लाख 5 हजार 717 मतं पडली.

राष्ट्रपती ते नगरसेवक, सर्व निवडणुकांची उमेदवारी

अभिजित बिचुकले यांचा सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील वावर कायम चर्चेचा विषय असतो. आतापर्यंत बिचुकले यांनी लोकसभा, विधानसभा अगदी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक लढवून झाली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याची निवडणुकीत त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली नाही. यासाठीच ख्यातकीर्त असलेले बिचुकले सुरुवातील स्थानिक पातळीवर फेमस होतेच. मात्र ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झाल्यामुळे त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली आणि आता ते अधिकच चर्चेचा विषय ठरु लागले.

विठुरायाच्या नगरीची झालेली दुर्दशा बघवत नाही. राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचे बिचुकले यांनी सांगितले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक प्रक्रिया थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. (Pandharpur Abhijit Bichukale Deposit)

पुणे मतदार यादीतच नाव नव्हते

काही महिन्यांपूर्वीच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूकही बिचुकले यांनी लढवली होती. मात्र, त्यावेळी मतदानाला गेलेल्या बिचुकले यांचे नावच मतदार यादीत सापडले नव्हते. त्यामुळे अभिजित बिचुकले यांना मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्यापूर्वी 2019 मध्ये अभिजित बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून थेट शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. मात्र तिथेही त्यांच्यावर डिपॉझिट जप्त करुन घेण्याची नामुष्की ओढावली होती.

संबंधित बातम्या 

भाजप आणि राष्ट्रवादीचं सोडा, पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत अभिजित बिचुकलेंची एन्ट्री

जी सीट बापानं तीनदा जिंकली, ती पोराला का जिंकता आली नाही? भगीरथ भालकेंच्या पराभवाची 5 कारणं

(Pandharpur by poll Results Bigg Boss Marathi fame Abhijit Bichukale Deposit Confiscated)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.